Sunday, 9 April 2017

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या कागल तालुका यांच्या वतीने पत्रकार मेळावा

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या कागल तालुका यांच्या वतीने पत्रकार मेळावा व सपोनि राकेश हांडे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम अध्यक्ष सुधाकर निर्मळे, कौन्सिल मेंबर सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी कौन्सिल मेंबर, सुरेश कांबरे, सहसचिव लक्ष्मण कांबरे, जिल्हा उपाध्यक्ष अवधूत आठवले, कार्यकारिणी सदस्य, नरेंद्र बोते, प्रकाश कारंडे, प्रकाश तिराळे,तालूका अध्यक्ष नंदकुमार कांबळे , तालूका कार्याध्यक्ष शशिकांत भोसले, उपाध्यक्ष विष्णू इंगवले यांच्यासह कागल तालूका व निपाणी परिसरातील विविध दैनिकांचे ६५ पत्रकार उपस्थित होते .