Friday, 21 December 2018

वाघवे प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचा प्रथम मानकरी कै.आण्णा स्पोर्ट्स वाघवे

वाघवे प्रतिनिधी..


----------------------------------------

वाघवे गावात प्रथमच आयोजित वाघवे प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेत श्री.संजय सुतार यांच्या कै.आण्णा स्पोर्ट्स वाघवे ने शंभू वाँरीयर्स ला पराभूत करुन वाघवे प्रिमीयर क्रिकेट स्पर्धेचा मानाचा चषक व रोख रक्कम १५००१/-चे पारितोषिक पटकावले.विजयी कै.आण्णा स्पोर्टस ला श्री.बाजीराव पोवार(पोलीस निरीक्षक) यांनी जाहीर केलेले रोख रु.१५०००/-व चषक हे बक्षीस विठ्ठल पोवार सर यांच्या हस्ते देण्यात आले.शंभू वाँरीयर्स ला रोख १००००/-व चषक हे बक्षीस माजगाव गावचे सरपंच श्री.शिवाजी पाटील यांच्या हस्ते प्रदान करणेत आले.तिसऱ्या क्रमांकाचे रोख रु.७०००/-व चषक हे बक्षीस पन्हाळा पंचायत समितीचे उपसभापती संजय माने व प्रविण पाटील यांच्या हस्ते कै.रामभाऊ स्पोर्ट्स ला देण्यात आले.चौथ्या क्रमांकाचे रोख रु.५१००/-व चषक हे बक्षीस श्री.महेश पाटील यांच्या हस्ते के.एम.सी.स्पोर्ट्स ला देण्यात आले.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कै.आण्णा स्पोर्ट्स चा जलसिंग या खेळाडूची  निवड झाली त्याला महादेव पाटील यांच्या हस्ते चांदीचे कडे बक्षीस म्हणून देण्यात आले.स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज तसेच उदयोन्मुख खेळाडू म्हणून गुड्यां पाटील याचु निवड करणेत आली.

बक्षीस समारंभ कार्यक्रमासाठी वाघवेचे सरपंच  श्री.अरुण चौगुले, उपसरपंच श्री.विजय विभुते,पोलीस पाटील गणेश पोवार,विठ्ठल पोवार,माजगावचे सरपंच शिवाजी पाटील,संजय माने,प्रविण उर्फ डिस्को पाटील, महेश पाटील, के.डी शेलार,विनायक शेलार इ मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत आठ फ्रँचाइस नी सहभाग नोंदवला होता.यामध्ये डाँ.घोलपे स्पोर्ट्स, आनंद स्पोर्ट्स, रामभाऊ स्पोर्टस, राणोजी पाटील किंग्ज इलेव्हन, शंभू वाँरीयर्स, के.एम.सी.स्पोर्ट्स, कै.आण्णा स्पोर्ट्स व उदाळे स्पोर्टस या आठ संघानी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डाँ.करण घोलपे,तुषार पाटील, निलेश उदाळे,दिनेश शेलार, संजय सुतार,दिपक पाटील, अशोक माने,लक्ष्मण सातपुते यांनी तसेच रमेश पाटील, बाजीराव कापसे,सुरेश बांबवडेकर, रघुनाथ कुंभार, संजय यादव,गणेश यादव,नामदेव पाटील तसेच वाघवे स्पोर्ट्स च्या सर्व आजी माजी खेळाडुनी आपले योगदान दिले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.अशोक पाटील सर यांनी मानले.

Friday, 14 December 2018

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्या मंदिर भोगलेवाडी शाळेचे घवघवित यश



पोहाळे/बोरगांव प्रतिनिधी

दि.१२- आज पोहाळे/बोरगांव केंद्रांतर्गत साळवाडी येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत भोगलेवाडी शाळेने घवघवीत यश प्राप्त केले.सदर स्पर्धेत लहान गटात मुली खो-खो-प्रथम क्रमांक,मुले खो-खो-तृतीय क्रमांक,१००मीटर धावणे अस्मिता नाईक-प्रथम क्रमांक,५०मीटर धावणे श्रृतिका भोगले- तृतीय क्रमांक पटकावला.अवघ्या २८ पटाची १ली ते ४ थी पर्यंतची ही शाळा; त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.त्यांना शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाळवेकर,अर्चना गुरव,अमित गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

Friday, 7 December 2018

वाघवे गावात प्रथमच आयोजित वाघवे प्रिमीयर लिग २०१८क्रिकेट स्पर्धेचा थरार....

वाघवे प्रतिनिधी दि. 7 डिसेंबर 2018


वाघवे ता.पन्हाळा येथील गणेश क्रिंडागणावर प्रथमच आयोजित वाघवे प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेचा थरार येत्या शनिवार पासून क्रिकेट प्रेमि नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे...सामुहिक व वैयक्तिक अशा पन्नास हजार रूपये बक्षिसे असणाऱ्या या स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे....स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे रू.१५०००/-व चषक हे बक्षीस वाघवे गावचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असणारे श्री.बाजीराव पोवार साहेब यांनी आपले वडील कै.महादेव पोवार यांच्या स्मरणार्थ दिले असुन द्वितीय क्रमांकाचे रु.१००००/-व चषक हे बक्षीस माजगाव येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.शिवाजी पाटील साहेब यांनी दिलेले आहे.तिसऱ्या क्रमांकाचे रू.७०००/-व चषक हे बक्षीस पन्हाळा पंचायत समितीचे उपसभापती श्री. संजय माने व वाघवे गावचे युवा नेते श्री.प्रविण उर्फ डिस्को पाटील यांनी संयुक्तिक पणे दिलेले आहे.चौथ्या क्रमांकाचे रू.५१००/-रु.व चषक हे बक्षीस वाघवे गावातील युवा उद्योजक श्री.महेश सखाराम पाटील यांनी दिलेले आहे.

वाघवे गावातील डाँ.करण घोलपे तुषार पाटील,दिनेश शेलार, अशोक माने,दिपक पाटील, निलेश उदाळे,संजय सुतार, लक्ष्मण सातपुते या क्रिंडाप्रेमीनी आठ संघांची फ्रँचाइस घेवुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे.

वाघवे गावातील क्रिडाप्रेमी दानशूर नागरिकांनी वैयक्तिक बक्षिसाची देणगी स्वरूपात रक्कम देवुन स्पर्धेला मदत केली आहे....

चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा उद्घटनाचा कार्यक्रम शनिवार दि.८ डिसेंबर२०१८रोजी सकाळी ठिक १०:००वा.मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असुन वाघवे गाव व परिसरातील क्रिडाप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने स्पर्धा पाहण्यासाठी गणेश क्रिंडागण वाघवे येथे उपस्थित रहावे असे आवाहन संयोजका मार्फत करणेत आले आहे.

Saturday, 1 December 2018

कोल्हापूर येथे मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्प

कोल्हापूर प्रतिनिधी 

भारतीय जैन संघटना, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व जैन डॉक्टर्स फेडरेशन, KY4H संस्था कोल्हापूर यांच्या तर्फे डॉ. राज लाला (अमेरिका) यांचे मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्प बुधवार दि. ०५ व गुरुवार दि. ०६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० ते ०४.०० या वेळेत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे सुरु होणार असून, तरी संबधित रुग्णांनी  नोंदणी करावी...

आपल्या ओळखीत, शेजारी अथवा माहितीमध्ये कोणी व्यक्ती अशा असतील की, ज्यांना काही शारीरिक व्यंग आहे व त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरीचा उपाय करायचा आहे. चेहऱ्यात काही व्यंग असल्यामुळे अनेक गरीब भगिनींची लग्न होत नाहीत व गरिबी मुळे उपचार होत नाहीत.  त्यांना नक्कीच या आमच्या उपक्रमाने खूप मदत होईल.

ज्यांना प्लॅस्टिक सर्जरीची खरचं आवश्यकता आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा वंचित लोकांसाठी आम्ही उपक्रम घेवून आलो आहोत याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे भारतीय जैन संघटना आणि डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 

गोवर रुबेला लसीकरण उत्साहात



.

     माजगांव प्रतिनिधी:—दि.३०/११/२०१८.

          गोवर रुबेला लसीकरण पोर्ले/ठाणे ता. पन्हाळा जि.कोल्हापूर येथील कुमार व कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे शाळेमध्ये उत्साहात पार पडले.कार्यक्रमाला सरपंच प्रकाश जाधव(गणा जाधव)यांनी फीत कापून सुरवात केली.

   याप्रसंगी पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.कवठेकर म्हणाले,गोवरा हा प्राणघातक रोग आहे.ज्याचा प्रसार विषाणूद्वारे होतो.गोवरामुळे विविध प्रकारची गुंतागुंत होऊन बालकांचा अकाली मृत्यु होऊ शकतो.

        रुबेला हा संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रसार विषाणूमुळे होतो.त्याची लक्षणे गोवरसाखीच असतात.त्याचा संसर्ग मुले आणि मुली दोघांनाही होतो.तथापि गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम सीआरएसमध्ये (जन्मजात रुबेला सिंड्रोम)होऊ शकतो.ज्याचे परिणाम गर्भासाठी व नवजात शिशुसाठी घातक ठरू शकतात.असे मत पंचायत समिती पन्हाळा चे विस्तार अधिकारी श्री.चौगले म्हणाले.

        कार्यक्रमाला कन्या शाळेचे 

मुख्याध्यापक नरहरी पाटील,  

कुमार शाळेचे मुख्याध्यापक सी.डी.सावंत, 

शिक्षक गणपती मांडवकर,

काशिनाथ जाधव,

आसिफ पठाण. 

हिंदुराव काशीद,

मारुती गवळी,

प्रकाश पोवार,

विकास कांबळे,

बाजीराव कदम,

कृष्णा कोरे,

सागर उबाळे,

डाॅ.कुणाल चव्हाण,

श्रीमती एम.एस. गाडगीळ,. 

सौ.व्ही.वाय. जाधव,

श्री.एम.आर पाटील,

आरोग्य सेविका ए.एस.आपटे,

आरोग्य सेवक ए.एस.पोवार 

सर्व आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.