Thursday, 17 November 2022

डॉ कमळकर यांच्या पुस्तकास बन्सल पुरस्कार


कोल्हापूर /प्रतिनिधी       
 कागल चे गटशिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर(रा मळगे बुद्रुक) यांच्या ऑनलाइन शिक्षण पद्धती या पुस्तकाला यावर्षीचा डॉ कुमुद बन्सल उत्कृष्ठ शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई मध्ये चार डिसेंबर ला होणाऱ्या शिक्षण परिषदेत हा पुरस्कार वितरीत होणार आहे.रोख रु पाच हजार सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.           यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक विषयावरील लेखनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ कुमुद बन्सल उत्कृष्ठ शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार दिला जातो.यावेळी महाराष्ट्रातील पाच पुस्तकांना पुरस्कार जाहीर झाला आहे.यामध्ये डॉ कमळकर यांच्या ऑनलाइन शिक्षण पद्धती या पुस्तकाचा समावेश आहे.कोरोना काळापासून ऑनलाइन शिक्षण पद्धती किती महत्वाची आहे याची जाणीव सर्वच क्षेत्राला झाली आहे.या ऑनलाइन शिक्षण पद्धतीने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करता येतात यावर सुंदर विवेचन कमळकर यांनी या पुस्तकात केले आहे.या पुस्तकाचे शिक्षण क्षेत्रात जोरदार स्वागत झाले होते.या पुरस्काराने या पुस्तकाचे महत्व अधोरेखित झाले आहे. 

Wednesday, 16 November 2022

मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांनी अनुभवली लक्ष्मी पाटील यांची आभाळमाया


हेरले /प्रतिनिधी
ज्ञानदान करत असतानाच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कार्यरत राहणे सगळ्यांना जमते असे नाही,
 पण आभाळमाय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक बँकेच्या माजी संचालिका  लक्ष्मी पाटील या याला अपवाद आहेत किंबहुना म्हणून त्यांनी आपल्या 43 वा वाढदिवस रत्नाप्पा कुंभार नगर येथील शिवाजीराव पाटोळे यांच्या मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला, यावेळी सर्व वृद्धांसाठी त्यांनी मायेने स्वेटर्स वितरण दिलासा संस्थेच्या अध्यक्षा प्रा .डॉ.रूपा शहा यांच्या समवेत केले.
वाढदिवस साजरा करायचा म्हणजे तो केवळ आपल्या नातेवाईक मित्र मैत्रिणी समवेत दिमाखात करायचा असे न करता  लक्ष्मी पाटील यांनी आपले आई-वडील तसेच बहिणी यांच्या समवेत आणि "आभाळमाय "संस्थेतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन तेथील आपल्या माणसांच्या मायेपासून वंचित वृद्धांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले हे करत असताना त्यांनी या सर्व वृद्धांना थंडीचे दिवस लक्षात घेऊन स्वेटर्स वितरण केले तसेच त्यांना भोजनही दिले.
वाढदिवसाच्या छोटेखानी कार्यक्रमात प्रारंभी  वर्षा येजरे  यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली शरद पाटोळे यांनी मातोश्री  वृद्धाश्रमाची वाटचाल कशी झाली याविषयी माहिती दिली,स्मिता व सुनील पुनवतकर यांनी सुरेल गीतगायन केले. तर वृद्धाश्रमाचे संस्थापक शिवाजीराव पाटोळे यांनी सध्या वृद्धाश्रमासमोर असणाऱ्या अडचणीविषयी सांगून  लक्ष्मी पाटील यांनी दिलेल्या मदतीच्या हाताविषयी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमात पाहुण्या म्हणून उपस्थित असणाऱ्या प्रा. डॉ. रूपा शहा यांनी  लक्ष्मी पाटील यांच्याकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमात बद्दल त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमात  लक्ष्मी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सर्व वृद्धांनी वाढदिवशी आपली आठवण ठेवून आणि हिवाळ्याचा काळ लक्षात घेऊन  लक्ष्मी पाटील यांनी जे दातृत्व दाखवले त्याबद्दल त्यांना मनापासून आशीर्वाद दिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आभाळमाया संस्थेचे सचिव अजित वारके उपाध्यक्ष सविता पाटील,बाजीराव पाटील मुख्याध्यापक राहुल ढाकणे शिक्षक बाजीराव कुंभार, राजू दाभाडे, सविता पोतदार,स्मिता पुनवतकर, जयश्री पाटील,शैलजा गरडकर,विद्या जाधव, शुभांगी सुतार,अश्विनी मगदूम,मंगल सुतार,मनोहर बावडेकर,विष्णू काटकर, यांचे सहकार्य लाभले.

फोटो 
मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना स्वेटर वितरण करताना लक्ष्मी पाटील ,बाजीराव पाटील ,प्रा. डॉ.रूपा शहा,शिवाजीराव पाटील व मान्यवर