कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत आजअखेर सुमारे 22 लाखांवर भाविकांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देशभरातून कोल्हापुरात भाविक आले होते .नवरात्रोत्सव, सलग सुट्या आणि त्यातही रविवार असल्याने भाविकांची गर्दी वाढणार, हे लक्षात घेऊन श्री महालक्ष्मी मंदिर समितीने नेटके संयोजन केले .
स्थानिक भाविकांसह परगांव आणि देशभरातील भाविकांनी यंदा देवीच्या दर्शनासाठी अमाप गर्दी केल्याने हा उत्सव देश व परदेशात पोहचला आहे ,नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देशभरातून कोल्हापुरात भाविक आल्याने गेल्या चार-पाच दिवसांत कोल्हापुरातील हॉटेल ,भक्तनिवास , लॉज ,फेरीवाले छोट्या व्यावसायिकांचा व्यवसायही तेजीत आहे. त्याशिवाय मुंबई महापालिकेची निवडणूकही येत्या काळात असल्याने मुंबईतूनही मोठ्या संख्येने भाविकांना घेऊन येणाऱ्या खासगी बसेस येत आहेत .महालक्ष्मी, जोतिबा दर्शन आणि पन्हाळगडाची सैर तसेच न्यू पॅलेस , कणेरी मठ या पर्यटन स्थळांनाही पर्यटकांनी पसंती दिली आहे
No comments:
Post a Comment