Tuesday, 25 October 2016

कोल्हापुरी लाईट माळा चिनी माळाना भारी

KOLHAPUR MH9LIVE REPORT - ‘चायनीज लायटिंगला कोल्हापुरी ची फाइट’ अशी परिस्थिती या वर्षी दिवाळी बाजारात पाहायला मिळत आहे भारत-पाकिस्तान यांच्यात बिघडलेले संबंध आणि चीनने पाकिस्तानला दिलेले समर्थन या पाश्र्वभूमीवर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असताना, संपूर्ण महाराष्ट्रातील  बाजारपेठेत ग्राहकांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. एरवी दिवाळीला चिनी बनावटीच्या लाईटच्या  तोरणांची खरेदी करणाऱ्यांचा मोर्चा आता कोल्हापूरमध्ये बनलेल्या लाईट  माळांकडे वळला आहे.सोशल मीडियावर चिनी लाइटिंग च्या  तुलनेत कोल्हापुरी लाईट माळा  सरस असल्याची माहिती प्रसारित केली जात आहे. कोल्हापुरी लाईट माळा च्या  या व्यवसायाने कोल्हापूरमधील पाचशेहून अधिक महिलांना घरोघरी रोजगार उपलब्ध झाला आहे. कोल्हापूर येथील पाचगाव, जवाहरनगर येथील महिलावर्ग दिव्यांच्या माळांचे बल्ब जोडणे, पीळ देणे, होल्डर बसविणे, कॅप बसविणे आदी कामे करतात आणि त्यानंतर या माळा विक्रीसाठी विविध शहरांत आणल्या जात आहेत.विजेची बचत
व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बेळगाव, गोवा, पुणे, ठाणे या ठिकाणी कोल्हापुरी दिव्यांचा प्रसार केला जात आहे. कोल्हापुरी दिवे एलईडी दिव्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याने विजेची मोठय़ा प्रमाणात बचत होते. कोल्हापुरी दिव्यांच्या माळा पन्नास फूट लांब असून प्रत्येक माळेत शंभर एलईडी बल्ब आहेत. यातील बल्ब खराब झाल्यास दुसरा बल्ब लावता येऊ शकतो, चिनी युज आणि थ्रो लाईट माळांना हा दणका च आहे

No comments:

Post a Comment