Saturday, 29 October 2016

सांगलीचे नितीन कोळी यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

जम्मूच्या कुपवाड्यातील
माछिल सेक्टरमध्ये सीमेवर पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री भ्याड हल्ला केला.
या हल्ल्यात मनजित सिंह आणि नितीन कोळी यांना वीरमरण आलं.
नितीन कोळी मुळचे दुधगाव (ता. मिरज) येथील असून बीएसएफच्या 156 बटालियनमध्ये कार्यरत होते. नितीन कोळी शहीद झाल्याचं कळताच दुधगावात शोककळा पसरली असून गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
गावचे सुपुत्र शहीद झाल्याने गावात दिवाळी न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.. दिवाळीनिमित्त घरावर लावलेले आकाशदिवे काढण्यात आले आहेत.
मूळ सांगलीतील दुधगावचे असणारे नितीन कोळी 2008 साली बीएसएफमध्ये रुजू झाले होते. ते सध्या बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून सीमेचं संरक्षण करत होते. त्यांच्यामागे पत्नी तसंच चार आणि दोन वर्षांची दोन मुलं असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment