Thursday, 13 October 2016

कोल्हापूरच्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले 


KOLHAPUR MH9LIVE NEWS REPORTER
शनिवारी (ता. 15) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी 50 लाखांची गर्दी अपेक्षित आहे.कोल्हापूरच्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले असून संयोजकांनी जोरदार तयारी केली आहे. शहराच्या नऊ एंट्री पॉईंटमधून वाहने व मोर्चेकरी शहरात येतील. गांधी मैदान, सायबर चौक, संभाजी महाराज पुतळा, रूईकर कॉलनी, भगवा चौक कसबा बावडा येथून मोर्चास एकाचवेळी सुरवात होईल. प्रत्येक ठिकाणी पाच मुली मशाल हाती घेऊन पुढे जातील. त्यांच्या मागे महिला, मुली, तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, आणि शेवटी राजकीय नेत्यांचा समावेश असेल. हा क्रम कोणत्याही परिस्थितीत बदलला जाणार नाही.शाळा, महाविद्यालयांसह उद्योग, व्यवसाय बंद राहणार असल्यामुळे त्या दिवशी कोल्हापूर अघोषित बंद राहणार आहे. 

No comments:

Post a Comment