Saturday, 12 November 2016

35 हजारांची लाच स्वीकारताना जिपच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहायकास अटक ,लाचेच्या रकमेत नव्या 2 हजाराच्या 17 नोटा

कोल्हापुर mh9 live news रिपोर्टर संदीप पोवार

500 आणि 1000 च्या नोटा चलनातुन हद्पार झाल्यानंतर  काळा पैसा व लाचखोरीला आळा बसेल असे वाटत होते पण आज कोल्हापुरात 35 हजारांची लाच स्वीकारताना जिल्हापरिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर यास अटक करण्यात आले , लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लावलेल्या जाळ्यात तो अडकला

महाराणा प्रताप हायस्कुल , दुधाळी  या शाळेतील मुख्यध्यापकाच्या पदोन्नतीच्या नेमणूक पत्र देण्यासाठी त्याने 40000 रू ची मागणी केली होती त्यात तडजोड होउन दसरा चौकातील साधना कैफेसमोर 35000 रू ची लाच स्वीकारली , लाचेच्या रकमेत नव्या 2 हजाराच्या 17 नोटांचा समावेश होता
कोल्हापुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक उदय आफळे यांनी आपल्या सहायकांसह ही कामगिरी पार पाडली , त्यानी सजग नागरीकांना लाचखोरीविरूद्ध  1064  या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे

No comments:

Post a Comment