Friday, 4 November 2016

चायना बंदुकीने खेळताना मुलाचा डोळा जायबंदी

चायना मेड  बंदुकीसाठी मिळणार्या मिसाईल्सच्या आकाराच्या छोट्या गोळ्या भरून  उडवताना मित्राच्या बंदुकीतून सुटलेली एक गोळी थेट रितेश शेटे  (वय ११ रा़ कोल्हापुर )उजव्या डोळ्यात लागली.
रितेशच्या बुबूळावर गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे ,
रितेशला डॉक्टरांनी दीड महिन्याची विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितले असून, तो शाळेलाही जाऊ शकणार नाही. दुखापत गंभीर असल्याने दीड महिन्यानंतर त्याच्या डोळ्यावर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे ,
वीस रुपयांच्या चायनामेड बंदुकीमुळे झालेल्या दुखापतीच्या उपचारासाठी रितेशच्या पालकांना 40 हजार रुपये आतापर्यंत खर्च करावा लागला आहे.
सोशल मीडियावरुन चायनीज फटाके व खेळणी घातक , धोकादायक असतात असे आवाहन करूनदेखील
काही लोक हा जीवघेणा धोका पत्करतात ,याबद्दल पोलीसांनीच असे धोकादायक चायना फटाके व खेळणी विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया नागरीकांतुन व्यक्त होत आहे

No comments:

Post a Comment