सध्या ५०० व १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सर्वत्र लांबच लांब रांगा लागत आहेत , मिडीया चैनलवाले लाईव्ह मुलाखती घेउन लोकांना नोटाबंदीचा किती त्रास होत आहे हे टाहो फोडून सांगत आहेत ,पण या रांगामागील सत्य जाणुन घेतल्यास तुम्ही आश्चर्यचकित व्हाल
काही ठिकाणी रोज तेच ते चेहरे नोटा बदलुन घेण्यासाठी रांगेत दिसतात , एका बँकेच्या रांगेत सामाजिक कार्य म्हणून काही व्यकतींनी या लोकांना सलग ४ दिवस मोफत सरबत व पाणी वाटप केले त्यावेळी त्यांना हा अनुभव आला की रोज ठराविक लोक नेहमी सकाळी रांगेत नंबर लावतात
एका झेरॉक्स सेंटर चालकाने सांगितले काही युवक व स्त्रिया ओळखपत्रांच्या १० ते २० झेरॉक्स प्रती घेऊन जातात आणि रोजंदारीवर रांगेत उभारुन नोटा बदलुन देण्याचा धंदा करतात
प्रत्यक्ष रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी लोकांची संख्या कमी असुन नोटा बदलुन घेण्यासाठी जास्त गर्दी आहे असे बँक कर्मचार्यांचे सुद्धा निरीक्षण आहे
No comments:
Post a Comment