कोल्हापूर mh9Live न्यूज प्रतिनिधि
कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र.11 कसबा बावडा या शाळेत अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन माननीय महापौर हसीना फरास यांच्या शुभहस्ते व माननीय उपमहापौर अर्जुन माने यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभागाच्या नागरसेविका माननीय सौ.माधुरी लाड या होत्या. माननीय नगरसेवक श्री.सुभाष बुचडे , मा. श्री.मोहन सालपे, शैक्षणिक पर्यवेक्षक श्री विजय माळी , उषा सरदेसाई,क्रीडा निरीक्षक सचिन पांडव,अपंग मार्गदर्शक राजेंद्र आपुगडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या झान्ज पथकाच्या गजरात विद्यार्थ्यांनी केले. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळया विषयांवर आधारित 75 प्रयोग मांडले होते. यामध्ये पाण्यावर तरंगणारा बटाटा, गायब होणारे नाणे,ज्वलनासाठी ऑकसिजनची गरज,आजीबाईचा बटवा,गरम हवा वर जाते,सौरऊर्जा काळाची गरज इत्यादी प्रयोगांचे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक स्टाफचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजितकुमार पाटील यांनी गुलाबपुष्प व रोप देऊन केले.माननीय महापौर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व वेगवेगळ्या प्रयोगांचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक केले. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना वाहतुक व मदतनीस भत्यांचे धनादेश देण्यात आले. करवीर काशी या साप्ताहिकाचे संपादक श्री. सुनीलकुमार सरनाईक यांनी शाळेच्या ग्रंथालयाला 50 पुस्तके भेट दिली. त्याचबरोबर दानोळी येथील तांबोळी वस्रनिकेतनचे श्री. रजाक तांबोळी यांनी शाळेस वैज्ञानिकांची माहिती पुस्तके भेट दिली.
या अपूर्व विज्ञानमेळाव्यास विद्याथ्यांचे सर्व पालक, परिसरातील विज्ञानप्रेमी नागरिक,भारतवीर मित्रमंडळाचे कार्यकर्ते, परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी भेट दिली. बालवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अस्लम पठाण ,सदस्य रमेश सुतार ,वैशाली करपे ,सुनीता पाटील, रजनी सुतार,वाकोजी पाटील,शाळेचे शिक्षक उत्तम कुंभार ,सुजाता आवटी,जे. बी. सपाटे, अरुण सूनगार ,प्राजक्ता कुलकर्णी,आसमा तांबोळी, सेवक मंगल मोरे,हेमंतकुमार पाटोळे तसेच भागातील पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.एस.तळप तर सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले व आभार शिवशंभू गाटे यांनी मानले.
▼
धन्यवाद सर आपण आमच्या शाळेच्या बातमीस आपण प्रसिद्धी दिलात...... आपल्या blog ला हार्दिक शुभेच्छा.
ReplyDelete