आजपासून शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये भक्तांना दर्शनाकरिता दर्शन पास सुविधा मिळणार आहे , त्यामुळे भक्तांना आगाऊ नोंदणी करून पास घेतल्यावर आपल्याला रांगेत किती वाजता प्रवेश मिळणार आहे हे समजेल .दर्शन नोंदणी केल्यानंतर पासच्या प्रवेश वेळेनुसार प्रवेशानंतर आता भक्तांना फक्त १५ मिनिटात साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे.या सुविधेमुळे भक्तांची रांगेतील अनावश्यक प्रतीक्षा कमी होईल ,नोंदणी करण्यासाठी संस्थानाच्या परिसरात १० काउंटर्स उघडण्यात आले आहेत. नोंदणी केल्यानंतर संस्थानातर्फे एक कार्ड देण्यात येईल ज्यावर तुम्ही कधी दर्शन करू शकता याची वेळ दिलेली असेल.
No comments:
Post a Comment