Saturday, 3 December 2016

एअरटेलने सुरु केली देशातील पहिली पेमेंट्स बँक


एअरटेल मनीच्या रुपात ई-वॉलेट सुविधा देणारी कंपनी एअरटेल रिजर्व बँकेकडून पेमेंट बँकेचं लायसेन्स मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे.बँकने सेविंग अकाउंटवर ७.२५ टक्के व्याज देण्याची देखील घोषणा केली आहे.जर १ हजार रुपयासह एअरटेल पेमेंट बँक खातं उघडता तर तुम्हाला १ हजार मिनिटं फ्री दिले जाणार आहेत. देशातील कोणत्याही भागात याचा वापर करता येणार आहे.नोटंबदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅशलेस योजना यशस्वी करण्यासाठी अनेक कंपन्या डि‍जिटल पेमेंटवर भर देत आहेत. एअरटेलने देशातील पहिली पेमेंट्स बँक सुरु केली आहे.पेमेंट बँकेचा मुख्य उद्देश हा लोकाना बँकिंग सुविधा पुरवण्याचा असतो.


No comments:

Post a Comment