Friday, 13 January 2017

कागलमध्ये घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प होऊ शकतो तर कोल्हापूरात का नाही ?


रोज तयार होणारा कचर्याची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल मोठमोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था चिंतेत असतात.
रोजच सफाईकामगार व नागरिकांच्यात वाद होतात , यावर मात करत कागल नगरपालिकेने मात्र घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करून कचऱ्याचे डोंगर होण्यापासून बचाव केला आहे. तसेच हा इतर शहरासमोर आदर्श निर्माण केला आहे.
२०१५ पासून हा वीज निर्मितीचा प्रकल्प कागलमध्ये कार्यरत आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दखल केंद्र आणि राज्य सरकारनेही घेतली आहे. १०० टक्के अनुदान तत्वावर साडेतीन कोटी रुपये मंजूर झालेल्या या प्रकल्पातुन रासायनिक प्रक्रियेतून गॅसनिर्मिती आणि गॅसपासून वीजनिर्मिती होत आहे. यातून राहणाऱ्या वेस्टेजपासून चांगले खत तयार होते.
तर याविरुद्ध जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या कोल्हापूरात मात्र कचर्याची परिस्थिति चांगली नाही , येथे कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी झुम नावाचा प्रकल्प आणला गेला पण अधिकारी व पदाधिकारी यांच्या खाबूगिरीने याचे तीनतेरा वाजले , दररोज साधारण २०० टन कचरा कोल्हापूर शहरातुन तयार होतो , झुम प्रकल्पावर कचर्याचे ढीगच ढीग लागले असुन प्रकल्प केव्हाच बंद पडला आहे , या प्रकल्पातील कचर्याला अनेकवेळा आगही लागली आहे  ,  कचरा टाकण्यासाठी रिकाम्या जागा मिळेणात ,  आता कोल्हापूरलाही कागलचा आदर्श घेण्याची वेळ आली आहे पण याला जोड पाहिजे अधिकारी व पदाधिकारी यांच्या इच्छाशक्तिची !

No comments:

Post a Comment