कोल्हापूर शहरातील शिरोली टोल नाका, शिवाजी पूल, कसबा बावडा, दसरा चौक, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या प्रमुख ठिकाणांसह १२ तालुक्यातील विविध ठिकाणी अश्या एकूण ५० ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी दि.३१ जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे . अत्यंत शिस्तबद्धरीत्या व शांततेच्या मार्गाने हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनातून परीक्षार्थी विद्यार्थी, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले, सर्वानी सकाळी १० वाजेपर्यंत नियोजित ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनहि सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment