रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन - आयडियाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.व्होडाफोन व आयडिया सेल्युलर मिळून भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनवण्याची तयारी करत आहेत.जर हे विलीनीकरण झाले तर देशातील १.७७ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार क्षेत्रातील बाजारात दोन्ही कंपन्या एकत्र मिळून एअरटेलला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरणार आहे. त्याचबरोबर क्रमांक एकची कंपनी होण्याचा रिलायन्स जिओच्या स्वप्नालाही मोठा झटका बसणार आहे.जिओने मार्च २०१७ पर्यंत मोफत कॉल-डाटा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे दराच्या लढाईमुळे महसुलावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे.कंपन्यांच्या नफ्यातही मोठी घट होत आहे.असे जर झाले तर बाजारात फक्त चारच मोठ्या कंपनाया उरतील
No comments:
Post a Comment