Wednesday, 26 July 2017

सोरायसिस माहिती व उपचार


आयुर्वेदाप्रमाणे ज्या व्यक्तीचे कफ आणि वात हे दोष बिघडलेले असतात,त्यांना सोरायसिस  या विकाराचा त्रास निर्माण होऊ शकतो. सोरायसिस याला मराठीत कंड रोगही म्हणले जाते तसेच याला सर्व त्वचा रोगांचा बादशहा म्हणले जाते .सोरायसिसचा आजार जडलेली व्यक्ती ही सार्वजनिक जीवनाला मुकते. घरचेही या व्यक्तीपासून दूर पळतात.हा रोग संसर्गजन्य नसला तरी वेळीच योग्य ते उपचार करून घेणं गरजेचं असतं.या आजाराचा उपचार आयुर्वेदात आहे ,हा आजार जसा औषधोपचाराने बरा होऊ शकतो  तसाच योग्य आहार व पथ्य पाळल्याने आटोक्यातही येऊ शकतो .
सोरायसिस म्हणजे काय ?
चा लाल व जाडी होते. जाड झालेल्या त्वचेवर अर्धवट सुटलेले पापुद्रे असल्याने त्वचेचं स्वरूप माशांच्या खवल्यांसारखं होतं. म्हणून त्या पापुद्रयांना शकल (खवले) असं म्हणतात.

पथ्थ्य ----
आहारात जास्त खारट (लोणचं, पापड, चिवडा, वेफर्स, फरसाण, खारेदाणे, खारवलेला सुकामेवा इ.), आंबट (चिंच, टॉमेटो, लिंबू, आमचूर, कैरी, दही, आंबट ताक, आंबट पेय, आंबवलेले पदार्थ इ.), अतिशय गोड चवीचे पदार्थ असणं. खाण्याचा सोडा किंवा इतर क्षार.
शिळे पदार्थ खाणं.
चहात बिस्किटं किंवा पोळी-चपाती बुडवून खाणं.
दूध आणि फळं एकत्र करून केलेले पदार्थ.
दूध आणि माशांचे पदार्थ एकाच वेळी खाणं.
वरील सर्व पदार्थ टाळणे हे सोरायसिस बरा होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे .

या विकारात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तेल लावून त्वचा तेलकट ठेवणं महत्त्वाचं असतं. कफ आणि वात दोष बिघडून हा विकार झाला असल्यास कोवळ्या उन्हात सकाळी बसल्याने हा विकार बरा होण्यास मदत होते.

सोरायसिसच्या आजारात तेलाचं मालिश अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण तेलामुळे कफ तर वाढत नाही. पुन्हा वाताचं शमन होतं. शिवाय त्वचेवर तेलाचा थर आल्यामुळे तिला भेगा पडत नाही. पापुद्रे सहज सुटतात. तेलामुळे त्वचा नरम पडल्यामुळे खाज येत नाही. खोबरेल तेलाचा वापर केल्यास चालते.

 ‘कॉर्टिकोस्टेरॉइड’सारख्या औषधाने या आजारात गुण येतो. परंतु यांचा उपयोग जाणकार डॉक्टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे. कारण या औषधाचा चुकीचा किंवा अतिप्रमाणात वापर धोकादायक असतो.
यापेक्षा आयुर्वेदिक औषधोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केल्यास अधिक उत्तम .

अडुळसा औषधी उपयोग



अडुळसा औषधी उपयोग
अडुळसा वनस्पतीच्या पानात व्हॅसिसीन अल्कीलॉईज असते. क्षयरोग, कफ, दमा, अस्थमा, खोकला या विकारांसाठी अडुळसा रामबाण म्हणून वापरला जातो. कफावर ज्यात फार दिवस खोकला येतो, बारीक ताप येतो तेव्हा दहा ग्रॅम म्हणजे चार चमचे रस व तितकाच मध व चिमूटभर पिंपळीचे चूर्ण एकत्र करून हे चाटण वरचेवर घेत राहावे. कफ मोकळा होतो व बरे वाटते. धाप लागणे, दमा यावरदेखील अडुळसा वापरला जातो. नाकातून, तोंडातून रक्त येत असेल तर पानांचा रस समभाग खडीसाखर घालून देतात. अडुळशाच्या फुलांचा अवलेह रक्त पित्त कमी करण्यासाठी वापरतात. पानांचा रस किंवा काढा मधाबरोबर आवाज बसला असता उपयुक्त असतो. आम्लपित्त, तापामध्ये आणि त्वचारोगामध्ये पंचतिक्ताचा (अडुळसा, काटेरिंगणी, कडुनिंब साल, गुळवेल, कडूपडवळ) काढा आणि सिद्धघृत दोन वेळा देतात. घरगुती वापर होताना तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे.
हल्लीच्या धावपळीच्या युगात ज्यांना वरील क्रिया शक्य नाही त्यांनी अडुळसा कफ सायरप घेतले तरी चालते , अडुळसा कफ सायरप कोणत्याही औषधी दुकानात सहज मिळते आणि ऍलोपॅथी कफ सायरप च्या तुलनेत कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत ,लहान मोठ्यांना पूर्ण सुरक्षित आहे .

Monday, 17 July 2017

हेडफोन मुळे येउ शकतो बहिरेपणा

आजची तरुणाई मोबाइलवेडी आहे, असे म्हटलस वावगे ठरू नये. मोबाइलवर बोलणे किंवा एमपी थ्रीवर गाणी ऐकणे यासाठी हॅन्डस् फ्री किंवा हेडफोनचा वापर तर फारच मोठ्या प्रमाणात केला जातो. हेडफोनच्या अतिवापरामुळ
अमेरिक्यासारख्या देशात तरुणाईला बहिरेपणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
दीर्घकाळ अगदी जवळून मोठा आवाज किंवा ध्वनी कानावर आदळल्याने कानाच्या अंतर्गतभागात इजा होणे, बहिरेपणा येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते, असे संशोधकांनी केलेल्या संशोधनात उघड झाले आहे.
संपुर्ण वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/हेडफोन्समुळे-येतो-बहिरेपणा-113071600020_1.htm

Sunday, 16 July 2017

अॅसिड़ीटी व फॅटसवर रामबाण उपाय

अॅसिडीटीचा त्रास असेल, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्याचं टेन्शन आलं असेल, तर सकाळी सकाळी कोमट ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून प्यायला सुरूवात करा, सकाळी लवकर उठल्यावर सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू पाणी घ्या.
तुम्हाला पोटाचे गंभीर विकार असल्याचं हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. लिंबू पाण्यामुळे एका आठवड्यातच तुम्हाला अॅसिड़ीटीपासून मुक्तता मिळू शकते, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्यातही मोठी मदत होते.
लिंबू आणि कोमट पाण्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. किडनीशी संबंधित तक्रारी देखील दूर होण्यास मदत होते. अन्न पचनात मोठी मदत होते.
एकदा हा प्रयोग करून पाहा, आठवड्याभरात फरक पडेल, लिंबू पाण्यात चमचाभर मध घेतल्यास आणखी मोठा फायदा होतो.

Friday, 14 July 2017

बामणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच बंद अवस्थेत

सिद्धनेर्ली(वार्ताहर)बामणी(ता.कागल)येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच बंद अवस्थेत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामपंचायतीच्या हाकेच्या अंतरावर असणार्या या आरोग्य केंद्राकडे ग्रामपंचायतिचे दुर्लक्ष आहे. त्या मुळे येथील कर्माचारी व अधिकारी यांचा मनमानी कारभार करीत आहेत. त्या मुळे बामणी येथील नागरिकाना सिद्धनेर्ली येथील आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे.   बामणी येथील आरोग्य केंद्र हे ग्रामपंचायतीच्या समोरच हाकेच्या अंतरावर असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या मनमानी कारभाराला खत पाणी मिळत आहे. आरोग्य केंद्रात येणार्या जाणार्या लोकाना कोणत्याही प्रकारची नोंद नसल्यामुळे नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.काही दिवसापूर्वी असेच सिद्धनेर्ली येथील आरोग्य केंद्रावर कागल पंचायत समितीचे उप सभापती रमेश तोडकर यांनी अचानक भेट दिल्यावर तेथील हि हजेरी पत्रकावर सह्या करून कर्मचारी व अधिकारी जाग्यावर नसान्याचा प्रकार समोर आला होता. हा प्रकार ताजा असतानाच बामणी येथील आरोग्य केंद्र हि कायम बंद अवस्थेत असल्याने या आरोग्य केंद्रावर कोणाचा वचक आहे कि नाही असा प्रश्न आता पुढे येत आहे.  खालावत चाललेल्या या आरोग्य केंद्राच्या सुविधेमुळे सामान्य नागरिकांचा मात्र आता विस्वास उठत जात आहे असून याचा नाहक त्रास मात्र सर्व सामान्य जनतेला सोसावा लागत आहे.       बामणी येथील आरोग्य केंद्रावर कदि कर्मचारी व अधिकारी असनार याचा फलक लावण्याची मागणी आता जनतेतून होत आहे. त्या मुळे सर्व सामान्यांना कळेल आणि त्यांच्या वेळेची बचत होईल.

फोटो – बामणी येथील कार्यालयीन वेळेतच  आरोग्य केंद्र टाळे ठोकून बंद अवस्थेत असताना.     

भारतीय असाल तर UC browser वापरू नका

चिनी वस्तू वापरू नका असे मेसेज फिरत आहेत, पण त्या साठी जे साधन वापरले जात आहे ते 90℅ मोबाइलला  चिनी UC browser आहे, आणि भारतातले 70% मोबाईल धारक uc browser किंवा uc mini चा वापर करतात , हा browser  सर्व मोबाईल वापरणाऱ्यांचा डाटा हॅक करून चीनला पाठवला जातो पटत नसेल तर या अॅपच्या परमीशन पहा हा UC browser तुमचा मोबाईल Track करतो. तसेच Users’ search  Yahoo  and Google यांना विकतो,  मोबाईलचा IMSI number, IMEI number, Android ID, and Wi-Fi MAC address यांची माहिती Alibaba या चीनच्या पोर्टलला पाठवतो तसेच users’ geolocation data (including longitude/latitude and street name) हि माहिती हॅक होते
फक्त एक महिना नाही वापरला तर चीन चे  भरपूर नुकसान होईल,
आपली जबाबदारी म्हणुन आपणास विनंती करतो की तुमच्या whatsapp contact मधला एक सुद्धा नंबर सोडु नका. सर्वांना ही माहिती पाठवा
Uc Browser आपल्या mobile मधून uninstall करून चीन चा निषेध करा आणि स्वतः हॅकिंग पासून वाचा.
जय हिंद !

Thursday, 13 July 2017

बोटाच्या बेचक्यातील चिखल्या उपाय व उपचार

सतत पाण्यात काम करणार्‍यांना अथवा पावसाळयाच्या दिवसात पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होतात. आपल्या कोल्हापूर आणि परिसरात त्याला ग्रामीण भाषेत पायाला खत लागणे असेही म्हणले जाते ,बहुतांशी ग्रामीण भागातील शेतात काम करणाऱ्या लोकांना चिखलात काम करावे लागते यावेळी या भेगा आणखीनच चिघळतात आणि तीव्र खाज व वेदना होतात ,महिलांना विशेषकरून धुनी भांडी करताना डिटर्जंट पावडर व साबण यांचा त्रास होऊनही अश्या भेगा पडतात अश्या वेळी कोणत्याही मेडिकलमध्ये मिळणारी अँटी फंगल क्रीम उपयोगी पडते तसेच खाज जास्त असल्यास सेंट्रिझिन गोळ्या उपयोगी पडतात , हे वारंवार होत असेल तर साबणाच्या पाण्यापासून दूर राहणेच इष्ट !