हेर्ले/ वार्ताहर दि. १/१०/१७
हेरले परिसरामध्ये सिमोल्लघंन पारंपारिक वाद्याच्या निनादात व देवांच्या पालखीच्या मिरवणूकीने मोठया उत्साहात संपन्न झाला.
हेरले गावामध्ये दसऱ्या दिवशी पाच वाजता मोठया भक्तीभावाने ग्रामस्थ गावातून गाव कामगार पाटील माजी सभापती यांच्या सोबत रॅलीने आबाल वृध्दासह माळ भागावरती जमा झाले. त्यांच्या सोबत श्री हनुमान देवाची पालखी, श्री बिरोबा व श्रीमसोबा देवाची पालखी यांच्यासह वाजत गाजत माळभाग येथील बिरोबा मंदिरामध्ये सर्वजण एकत्र आले. येथे आपट्याच्या पानांचे पूजन राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी तलवारीने आपट्यांच्या फांदया बांधलेला दोर तोडल्यानंतर ग्रामस्थांनी आपट्याची पाने लूटली.
हेरले, मौजे वडगाव, चोकाक, माले, मुडशिंगी आदी गावांमध्ये दसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी सर्व देवांना सोने घालून दर्शन घेतले, मित्रमंडळी, पैपाहुणे, शेजारीपाजारी यांना सोने देऊन सोन्यासारखे राहण्याचा संदेश दिला. या गावांमध्ये ऑक्टोबंर मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमुळे गट तट आघाडी संभाव्य ग्रामपंचायतीचे उमेदवारांनी मोठ्या प्रेमभावांनी सर्वांशी संवाद साधत दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन थोरामोठ्यांचा आशिर्वाद घेतला. सर्वच गावांमध्ये आनंदाचे उधाण आले होते.
फोटो
हेरले येथे गाव कामगार पाटील राजेश पाटील शम्मीचे पूजन करून तलवारीने दोर तोडतांना.
No comments:
Post a Comment