हेरले / प्रतिनिधी दि. १३/१०/१७
मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत जय हनुमान ग्रामविकास आघाडी पुरुस्कृत उमेदवार माजी उपसरपंच सुरेश कांबरे व अपक्ष उमेदवार प्रकाश कांबरे यांनी जय शिवराय आघाडीच्या अविनाश कांबळे व संयुक्त आघाडीच्या काशिनाथ कांबळे यांच्या बरोबरीने प्रचारात आघाडी घेतलेने चौरंगी काटा लढत होत आहे. पहिल्यादांच थेट जनतेतून सरपंच निवडीमुळे गट कार्यकारी प्रमुख म्हणून कार्यकरणाऱ्या कांबरे बंधूंनी स्वयंभू ताकदीने हाय होल्टेज लढत निर्माण केली आहे. त्यामूळे त्यांनी संपूर्ण तालूक्याचे लक्ष वेधले आहे.
मौजे वडगावचे सरपंचपद अनुसूचित जाती पुरूषसाठी राखीव आहे. थेट जनतेतून सरपंच पद निवडले जात असलेने पाच वर्षाचा कालावधी या पदाला मिळणार आहे. या सरपंच पदाने बहुआयामी नेतृत्व उभारीस येणार आहे. युवा मतदार सुशिक्षित असलेने शाननाचे ध्येय ग्राम विकास हा सरपंचावर अंवलंबून आहे.हे ज्ञात झालेने योग्य उमेदवारास निवडून आणून कार्यकुशल सरपंच गावास मिळावा. हे स्वप्न सत्यात उतरविणेसाठी त्यांनी उच्चशिक्षित व सुशिक्षित अशा उमेदवारास साथ देण्याचा पक्का निर्धार केल्याची चर्चा तरुण मंडळातून होत आहे. जय हनुमान ग्रामविकास आघाडीचे पुरूस्कृत उमेदवार सुरेश कांबरे यांना गटनेते सरपंच सतिश चौगुले,बाळासाहेब थोरवत, धोंडीराम चौगुले, महादेव शिंदे, दादा चौगुले, महादेव चौगुले, आनंदा थोरवत यांनी साथ देत ग्रा.सदस्यसाठी पॅनेल उभा न करता फक्त सरपंच पदाची जागा लढवत आहेत. माजी उपसरपंच सुरेश कांबरे पदवीधर असून गेली २२ वर्षे सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांनी या आघाडीचे नेतृत्व करून २००७च्या निवडणूकीत निववडून येऊन उपसरपंच पदाच्या माध्यमातून एक कोटीची विकास कामे केली. गावास तंटामुक्त व निर्मलग्राम पुरस्काराचा बहुमान मिळवून दिला.शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकिय, आर्थिक क्षेत्रात सदैव अग्रभागी राहतात. विदयार्थी , ग्रामस्थ, लहान थोरांच्या समस्या अडीअडचणींना तत्पर मदत करणारे असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे.
२oवर्षापासून दूधसंस्था, विकास संस्था,ग्रामपंचायत आदीच्या निवडणूकीत अग्रस्थांनी राहून गटनेत्यांना विविध पदावरती आरूढ करणेसाठी आहोरात्र राबून त्यांना पदापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिक कार्य केले आहे. त्यांनी सामाजिक सेवा सातत्याने केलेने त्यांचा गावात बोलबाला आहे. गटनेत्यांनीही आपल्या प्रामाणिक एकनिष्ठ शिलेदारास सरपंच करण्याचा चंग बांधला असल्यामुळे त्यांचे मोठेआव्हान निर्माण झाले आहे.
अपक्ष प्रकाश कांबरे पीके ग्रुप सामाजिक सेवा ग्रुपच्या माध्यमातून सरपंच पदासाठी उभारले आहेत. त्यांच्या पत्नी संगिता कांबरे यांनी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्याच्या पदातून लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत. प्रकाश कांबरे गेली पंचवीस वर्षे सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांनी ही विविध क्षेत्रातील निवडणूकीच्या माध्यमातून सांघिक कार्यकारी प्रमुखाची भूमिका बजावली आहे. गेली सहा महिन्यापासून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून प्रत्यक गाठी भेटीवर भर ठेवून स्वयंभू प्रचार यंत्रणा गतीमान केली आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कामे केल्याने त्यांच्याही उमेदवारीने निवडणूकीत रंग भरून आव्हान निर्माण केले आहे. त्यांना पीके ग्रुपच्या कार्यकर्त्यांची साथ आहे.
जय शिवराय आघाडीचे उमेदवार अविनाश कांबळे सत्ताधारी आहेत. गतवेळच्या निवडणूकीत सदस्य झाले नंतर त्यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली. या पदाच्या माध्यमातून त्यांनी यथाशक्ती विकास कामांची कार्ये केली. अविनाश कांबळेही गेली वीस वर्ष सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांना आघाडीची ताकद मिळाली आहे त्यामुळे त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. आघाडीचे गटनेते अॅड. विजय चौगुले, सतिश वाकरेकर यांची साथ मिळत आहे.
संयुक्त आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार काशीनाथ कांबळे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी काही कालावधी समाजसेवा केली आहे. त्यांचा सामाजिक कार्यातील सांघिक सहभाग पाहून आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यांना आघाडीची ताकद मिळाल्याने त्यांचे आव्हान निर्माण झाले आहे. गटनेते मानसिंग रजपूत, किरण चौगुले, अवधूत मुसळे, डॉ. विजय गोरड, मुबारक बारगीर यांची साथ त्यांना लाभली आहे.
दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारास प्रभागामधील उमेदवारांचे सहकार्य लाभलेने मोठी ताकद मिळते. त्याप्रमाणे दोन्ही आघाड्यातील उमेदवारांना प्रतिसाद लाभत आहे. जय हनुमान आघाडीची चारीही प्रभागात दोन्ही आघाड्यांना विजयी -पराजयी करण्याइतपत ताकद आहे. त्यामुळे सरपंच उमेदवार सुरेश कांबरे यांना दोन्ही आघाड्यातून सहानूभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यांच्या आघाडीचा प्रभागातील उमेदवारांसाठी पाठींबा मिळविण्यासाठी दोन्हीकडून धडपड चालली आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान दोन्हीआघाड्यांना चिंतनात्मक ठरत आहे. अपक्ष उमेदवार प्रकाश कांबरे दोन्ही आघाडांच्या नेते व कार्यकर्ते यांच्या मैत्रीपूर्ण संपर्कात असलेने त्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.
हातकणंगले तालूक्यामध्ये मौजे वडगांव मध्ये अनुसूचित जाती पुरुष सरपंच पदाची चौरंगी लढतीत सुरेश कांबरे व प्रकाश कांबरे हे कांबरे बंधू स्वयंभू ताकदीचे असलेने आघाडीच्या उमेदवारांस त्यांनी कडवे आव्हान निर्माण केलेले आहे. त्यामुळे या लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:
Post a Comment