Saturday, 21 October 2017

महिलांनी घर संसार सांभाळून छोटया, मोठया व्यवसायाच्या माध्यमातून यथाशक्ती आर्थिक स्त्रोत निर्माण केले पाहिजे. असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

हेर्ले/ वार्ताहर दि. २१ / १o/१७
जो पर्यंत स्त्री आर्थिक स्वावलंबनासाठी कमवणार नाही तोपर्यंत तिची घरामध्ये किंमत वाढणार नाही. म्हणून महिलांनी  घर संसार सांभाळून छोटया, मोठया व्यवसायाच्या माध्यमातून यथाशक्ती आर्थिक स्त्रोत निर्माण केले पाहिजे. असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
      ते हेरले ( ता. हातकणंगले) येथे महिला सबलीकरण ध्येयातून तेरदाळे कुटूंबांने श्री घरगुती बिस्कीटाचे अद्दायावत युनिट सुरू केले आहे. त्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
    ना. पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक कुटुंबांत चार तास पुरूषाने व चार तास स्त्रीने आपआपली कर्तव्याची कामे केली, तर निस्चित आर्थिक स्तर उंचावून विकास होईल. कोल्हापूर जिल्हयात स्वयंसिद्धाच्या माध्यमातून संचालिका कांचनताई परूळेकर यांनी ५० हजार स्त्रियांना स्वयंम रोजगारासाठी प्रशिक्षित केले आहे. त्यापैकी चार हजार पाचशे स्त्रिया स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी झाल्या आहेत.  झोपडपट्टीतील २५० मुलांना दररोज त्यांना बिस्कीट मिळावीत यासाठी तरतूद केली असून स्वयंसिध्दा यांना ऑर्डर दिली आहे . महिला व्यवसायकांना  मिळालेल्या बाजारपेठेमुळे व्यवसायास बळ मिळणार आहे.
         जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक म्हणाल्या की, प्रत्येक घरामध्ये महिला घरचा खर्च काटकसरीने करीत त्यातील अल्पबचत करीत असतात. आर्थिक अडचणीच्या वेळी ती रक्कम कामी येते. याच प्रमाणे महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून विविध घरगुती व्यवसाय सुरू करून आर्थिक स्तर उंचावून संसारास बळकटी आणावी असे आव्हान केले.
      प्रथमतः नामदार चंद्रकांत पाटील व जि.प अध्यक्षा शौमिका महाडीक, कांचनताई परूळेकर यांच्या हस्ते घरगुती बिस्कीटचे अद्यायावत युनिटचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तेरदाळे कुटुंबांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी तृप्ती पुरेकर, सौम्या तिरोडकर,माजी सभापती राजेश पाटील, जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, पं.स. सदस्या मेहरनिगा जमादार, नूतन सरपंच अश्विनी चौगुले, पी.डी. पाटील,पोलीस पाटील नयन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पद्मश्री तेरदाळे यांनी केले. आभार डॉ. संताष तेरदाळे यांनी मानले.

     फोटो
हेरले ( ता. हातकणंगले) येथे कार्यक्रमात बोलतांना नाम. चंद्रकांतदादा पाटील बोलतांना शेजारी जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक, राजेश पाटील व इतर मान्यवर

No comments:

Post a Comment