Friday, 27 October 2017

पेट्रोल पंपवाल्यांची लबाडी - एका ग्राहकाला आलेला धक्कादायक अनुभव -------


" दिनांक ३ अॉक्टोबर, यात्रेवर रवाना होण्याआधी, सकाळी दहाच्या सुमारास ठाण्यात एका पेट्रोल पंपावर कार मध्ये डिझेल भरताना, कर्मचा-यास ,पाईप लिव्हर  अॉटोलॉक करून टैंक फुल्ल करण्याची सूचना दिली. त्यानेही लिव्हर अॉटो लॉक केला व जरासा बाजूला झाला. तेवढ्यात डिझेल भरणे सुरू असताना, त्यांचा मुकादम आला व काहीही न बोलता त्याने लिव्हर तीनदा थोडा थोडा दाबून सोडला. हे मी आरशातून पाहिलं. उतरलो. त्याला विचारलं.. अॉटोलॉक डिझेल भरणे चालू असताना तीनदा लिव्हर कशासाठी दाबला ? तो चाचरला... मग उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला... मी त्याला खडसावून विचारले पण बाकीचे कर्मचारी लगेच त्याच्या मदतीस आले. मला पुढे जायचे असल्याने, मी आवरते घेतले. नंतरच्या आठवड्यात दोन तीन वेळा  एच पी / बीपी पंपावर डिझेल कर्मचा-यांंना खोदून खोदून विचारले की डिझेल भरताना लिव्हर खेचून नक्की काय करतात? पण त्यांनीही माहित नाही अशीच संदिग्ध उत्तरे दिली.
आज पुण्यात शेल पेट्रोल पंपावर डिझेल भरताना... तिथल्या कर्मचा-यास बोलते केले.... त्याने तत्काळ उत्तर दिले
..सर, आमच्याकडे असे कधीच होत नाही. पण लिव्हर खेचल्याने डिझेल थांबते पण बिलाचे आकडे चालूच राहतात. अशा रितीने शे दिडशेचा फायदा, कर्मचारी मालकाला करून देतो.

या बाबीवर आणखी कोणी प्रकाश पाडू शकल्यास, धन्यवाद.

डिझेल/पेट्रोल भरले जात असताना लिव्हर एक दोन वेळा जरी खेचला तरी,  रिडींग सुरूच राहते. नुकसान ग्राहकाचे होते.

आपण सावध असावं.... सुरू केल्यानंतर, पुन्हा लिव्हर खेचायचा नाही अशी सूचना द्यावी. लक्ष ही ठेवावे.

प्रश्न शे दीडशे रूपयांचाच . पण आधीच प्रशासन डिझेल /पेट्रोल साठी आपल्याला नाचवतय, त्यावर हा भुर्दंड का सोसायचा?  आपल्याकडे वेळही नसतो. वादविवादासाठी. "

म्हणून  जनहितार्थ. सोशल मीडियावरुन साभार.

No comments:

Post a Comment