प्रतिनिधी
समर्पणाच्या भावनेने व प्रामाणिक पणाने काम करण्याच्या कार्यशैलीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 'बार टू मेडल ऑफ मेरीट ' या पुरस्काराने राज्यपाल सी .विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई येथे स्काऊट गाईड पॅव्हिलियन शिवाजी पार्क येथे सन्मानित करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र राज्य स्काऊट अँड गाईडचे मुख्य आयुक्त भा .ई .नगराळे हे उपस्थित होते .
माध्यमिक शिक्षणधिकारी किरण लोहार पुरस्कार मिळाले नंतर माध्यमांशी बोलतांना म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार वर्षे सेवा बजाविली.या काळात चार वर्ष एसएससी बोर्ड सहसचिव, याचबरोबर एक वर्ष सचिव अतिरिक्त कार्यभार सांभाळला. दोन वर्ष अतिरिक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यभार समर्थपणे कर्तव्य बजावले. कोल्हापूर जिल्ह्यात दीड महिने सेवा बजावत आहेत. या काळात जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक दिनी हजर राहून कार्यालयातील कामाचा निपटारा सुरु आहे. आठवड्यातील सहा दिवस कार्यभार सांभाळत शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
७९ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची सुनावणी एका दिवसात पूर्ण केली. जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता, स्काऊट गाईड, एनसीसी, खेळ, आरएसपी, एमसीसी, कला, क्रीडा यावर विशेष लक्ष देऊन कार्य करणार आहे. एनटीस, एमएमएस, स्कॉलरशीप आदी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विदयार्थी यशस्वी होणेसाठी प्रयत्नशील राहणार आहे. या यशासाठी शिक्षकांनी सहकार्य करावे.
फोटो - राज्यपाल सी .विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी किरण लोहार व त्यांच्या पत्नी सुजाता लोहार.
No comments:
Post a Comment