कोल्हापूर प्रतिनिधी - कृषी पर्यटन विकास संस्थेच्या सहकार्यातून , महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने नुकतेच कृषी पर्यटन धोरण -२०१७ जाहीर केले आहे, कृषी पर्यटन व्यवसायाला कृषी पूरक व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली असून, कृषी पर्यटन संकल्पना आता चांगल्या पद्धतीने शेतकरी वर्गाला फायद्याची होत आहे . कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी पर्यटन विकास संस्था पुणे यांच्या प्रयत्नातून १२ नोव्हेंबर २०१७ रोजी हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे एक दिवशीय कृषी पर्यटन प्रशिक्षण आयोजित केले आहे.
महाराष्ट्र राज्यात कृषी पर्यटन संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने विकसित झाली असून आज मितीस ३६५ कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रात कार्यरत आहे. मागील तीन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांना १७ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या असून व यातून ३५ कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल झाली आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून १०००० लोकांना रोजगार मिळाला आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, या जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटन संकल्पनेला चांगला वाव आहे. उत्तम प्रकारे नवनवीन प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते, मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे, ऊस, भाजीपाला, फळे, फुले, तसेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून गूळ , दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन, शेळी पालन , रोपवाटिका हे जोड व्यवसाय केले जातात. पर्यटनासाठी धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक दृष्ट्या मोठा वाव या सगळ्या जिल्यात आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन शेतकऱ्यांच्या शेतावर चालू करणे. शेतात उत्पादित झालेला शेतीमाल आपल्याच शेतावर विकला जावा, परिसराची , गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला व्हावी , शेतकरी बंधू भगिनींना कृषी पर्यटनातून आर्थिक उत्पन्न मिळावे व कृषीला पूरक व्यवसाय मिळावा यासाठी एक दिवशीय कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी 8390906677 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आपणास विनंती की आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायला सांगा.
No comments:
Post a Comment