प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
नोटाबंदी मुळे खरोखरच मंदी आली आहे का ?
वाहन विक्री चा अभ्यास केला तर याचे नाही असे येते.
autopunditz या वाहन विक्री चे विश्लेषण करणाऱ्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली माहिती पाहता गतवर्षी नोटा बंदी होण्यापूर्वी सप्टेंबर 2016 व नोटाबंदी नंतर सप्टेंबर 2017 चा तुलनात्मक अभ्यास केला तर वाहन विक्री सुसाट असल्याचे जाणवते.
एकीकडे मीडियावर मंदी, महागाई व बेरोजगारीची टिमकी वाजवली जात असताना दहा लाख रुपये पेक्षा जास्त किंमती च्या कार मात्र दुप्पट विकल्या जातात.
मारुती स्विफ्ट डिझायरची सप्टेंबर 2016 मध्ये 18 हजार विक्री झाली होती तर सप्टेंबर 2017 मध्ये 34 हजार विक्री झाली आहे. ह्यूंदाई वेरणा जिची किंमत 12 ते 15 लाख आहे त्या 1200 वरुन 6000 पर्यंत विकल्या गेल्या. मारुती विटारा ब्रीझा 9 हजार वरुन 13 हजार पर्यंत विकल्या गेल्या. महिंद्रा बोलेरो 5 हजार वरुन 8 हजार पर्यंत विकल्या गेल्या. मारुती बलेनो 10 हजार वरुन 16 हजार पर्यंत विकल्या गेल्या.
ही अभ्यास पूर्ण माहिती खास आपल्यासाठी mh9kolhapurnews.blogspot.in च्या माध्यमातून देत आहोत. सोबतच्या फोटोत वाहन विक्री सविस्तर विश्लेषण केले आहे.
No comments:
Post a Comment