हेरले/ प्रतिनिधी दि.र९/१/१८
महाराष्ट्र शिक्षण बचाव कृती समितीची सभा पुणे येथे २८ जानेवारी रोजी शिक्षण बचाव प्रश्ना संदर्भात संपन्न झाली. या वेळी महाराष्ट्रातील ९२ संघटनेचे प्रतिनिधि उपस्थित होते.
पदवीधर मतदार संघाचे आमदार विक्रम काळे(औरंगाबाद), आम..डॉ.सुधीर तांबे (नाशिक), आम.निरंजन डावखुरे (नवी मुंबई), आम.बाळाराम पाटील (कोकण), आम.दत्तात्रय सावंत (पुणे), आम.अपूर्व हिरवे (अमरावती) आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर परिषदेसाठी जुनी पेंशन संघटनेच्या वतीने जगदीश ओहोळ पुणे, अमोल शिंदे सांगलीे, राहुल कांबळे, विकास चौगुल कोल्हापूर , सचिन खरतोडे रायगड, याशिवाय सांगलीतून आरोग्य विभागाचे (dcps )धारक कर्मचारी उपस्थित होते..
याप्रसंगी सर्व आमदारांना पेंशन संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले,
सर्व आमदारांनी जुनी पेंशन साठी चा लढा आणखी तीव्र करणार असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
सदर परिषदेस शिक्षक संघाचे राज्यानेते संभाजीराव थोरात ,कोल्हापूर समन्वय समितीचे नेते मोहन भोसले, राज्यनेते जनार्दन नेऊंगरे उपस्थित होते. आमदारांना पेंन्शन विषयाचे गांभीर्य पटवून देण्यास मदत केली. ही परिषद भाऊसाहेब चासकर , मधुकर काढोळे, यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आली होती.
भविष्यात शिक्षण हक्क कायद्याची अंमल बजावणी योग्य पद्धतीने व्हावी आणि शिक्षणाचे खाजगीकरण याविरोधात व्यापक लढा उभा करण्याचा निर्धार याठिकाणी सर्व संघटनाच्या उपस्थितीत करण्यात आला.
पेंशन संघटनेच्या वतीने विकास चौगुले यांनी पेंशन संघटनेचा लढा , वाटचाल याविषयीची माहिती मांडली. अशी माहिती प्रसिध्दीस कोल्हापूर समन्वय समितीचे शिक्षक नेते मोहन भोसले यांनी दिली.
फोटो
पुणे येथे महाराष्ट्र शिक्षण बचाव कृती समिती सभा प्रसंगी चर्चा करतांना आम. दत्तात्रय सावंत, राज्य नेते संभाजीराव थोरात,मोहन भोसले, व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment