Monday, 12 February 2018

कोल्हापूर मनपा पुन्हा एकदा बिन आवाजाचा बॉम्ब फुटला, स्थायी सभापती पदी विरोधी भाजप ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे विजयी

कोल्हापूर प्रतिनिधी.

कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत आहे. महापौर कॉंग्रेस चा आहे तर स्थायी समिती सभापती संदीप नेजदार (कॉंग्रेस) यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यावर या पदावर राष्ट्रवादीचा दावा होता.
आज सकाळी महानगरपालिका सभापती निवडीत सत्ताधारी राष्ट्रवादी व कॉंग्रेस ला
धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील पराभूत झाल्या . तर स्थायी समिती सभापतीपदी भाजप- ताराराणी आघाडीच्या आशिष ढवळे यांची निवड झाली .  काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण हे दोन नगरसेवकांनी विरोधी मतदान मेघा पाटील यांचा पराभव झाला.

महानगरपालिकेचे अर्थकारण ज्याच्या हातात असते ते स्थायी सभापती पद विरोधी पक्षाकडे गेल्याने आज खरोखरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटला.
स्थायी समिती सदस्य संख्याबळ पुरेसे असल्याने आपलाच विजय होणार असा विश्वास काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना होता. त्याला सुरुंग लागला  अचानक दोन नगरसेवक फुटल्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीचा विजय झाला . तर  नेत्यांनी डावलल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला असल्याचं फुटलेल्या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
     काही का असेना या निमित्ताने कोल्हापूर मनपाचे राजकारण हे 360 अंशावर कसे फिरु शकते हे आज दिसले. व्हीप असुनही त्याला न जुमानता सदस्य फुटले, याचा अर्थ पक्षीय राजकारणाला येथे सोयिस्करपणे वळचणीला ठेवले जाते.


No comments:

Post a Comment