कोल्हापूर प्रतिनिधी :
राजस्थान (कोटा) येथे 21 जानेवारी, 2018 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत डॉ. सायरस पूनावाला स्कूलच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश प्राप्त केले असून तीन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत विविध राज्यातील एकूण 50हून अधिक शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत डॉ. सायरस पूनावाला स्कूलच्या 10 विद्यार्थ्यानी भाग घेवून घवघवीत यश संपादन केले. यामध्ये आर्या पवार, स्पंदन मिरजकर, आर्या कदम, रितेश उलपे, स्वर्णिम मडके , आदित्यराज षिंदे, संचित ढेरे, विराज पाटील, वरद पाटील, सुजित कुडाळकर या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.नियमितचा सराव आणि सातत्य याचा विद्यार्थ्याना खूप फायदा झाला आहे. यामधील तीन विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणा-या अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिवा सौ. विद्या पोळ, स्कूलचे संचालक डॉ. सरदार जाधव यांचे प्रोत्साहन लाभले तर प्राचार्या स्नेहल नार्वेकर व अॅबॅकस मार्गदर्शिका सफिना मोमीन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
▼
No comments:
Post a Comment