Wednesday, 14 February 2018

पुणे धरणे आंदोलनानंतर माध्य. शिक्षणाधिकारी लोहार यांची आंदोलकांशी तातडीने चर्चा

कोल्हापूर प्रतिनिधी  दि. १४/२/१८

पुणे येथे धरणे आंदोलन केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाला माध्यमिक  शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी तातडीने चर्चेसाठी बोलावले .या बैठकीत मार्च अखेर  जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे  थकीत वेतन देण्याचा निर्णय झाला .
      अतिरिक्त समायोजन संदर्भात मुख्याध्यापकांचे थकलेले वेतन संचालकांच्या मान्यतेनंतर  जानेवारी २०१८ अखेरपर्यंतचा   पगार सुध्दा  तीन ते चार दिवसांत जमा होणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले .अशैक्षणिक कामे व  शालेय पोषण आहाराबाबतच्या  विविध प्रश्नांबाबत प्राथमिक विभागाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे यावेळी  निश्चित केले .ऑनलाईन कामे शिक्षकांनी न करता लिपिकामार्फत करावीत, वेतन पथकाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या २०टक्के अनुदानाबाबत त्रुटी पूर्तता  करण्यासंबंधीचा निर्णयही  झाला . तसेच उच्च माध्यमिकचे प्रस्ताव या आठवड्यातच  पूर्ण करण्यात येणार असल्याचे ही स्पष्ट केले .
      शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस .डी. लाड वसंतराव देशमुख , व्ही.जी. पोवार ,आर. वाय . पाटील , खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, उदय पाटील, डॉ. ए. एम .पाटील ,बी .बी .पाटील .बी .डी .पाटील, संदीप पाटील ,गजानन काटकर , मिलींद बारवडे, भाऊसाहेब सकट,आदी उपस्थित होते .  सी.एम .गायकवाड यांनी  आभार मानले .
         फोटो
शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निवेदन देताना एस.डी. लाड. वसंतराव देशमुख,व्ही.जी. पोवार, खंडेराव जगदाळे आदीसह अन्य पदाधिकारी.

No comments:

Post a Comment