कोल्हापूर :प्रतिनिधी
शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय शुक्रवार दि. २३ रोजी जाहीर केला .जिल्ह्यातील चार गट शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे .आजरा ,गडहिंग्लजचे गटशिक्षणाधिकारी टी .एल .मोळे यांना कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ सहसचिवपदी पदोन्नती मिळाली आहे .
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मधील उपशिक्षणाधिकारी व अन्य पदावर कार्यरत अधिकाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या निवडीनुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ (प्रशासन शाखा )मधील शिक्षणाधिकारी पदावर सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे .राज्यातील२३अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे .कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी एल.एस.पाच्छापूरे यांची भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाली .कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळातील सहाय्यक सचिव व्ही.पी .कानवडे यांची वर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी ,गगनबावडा गटशिक्षणाधिकारी टी. एन.नरळे यांना वाशीम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे .
No comments:
Post a Comment