Tuesday, 6 February 2018

आर्यन लोंढेला गोवा येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

हेरले / प्रतिनिधी दि. ६/२/१८
         मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील कराटे  पट्टू आर्यन रमेश लोंढे यांने  गोव्यातील शेातोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुमिते फाईट प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.
        पेदम स्पोर्टस् काॅम्पलेक्स मापुसा, गोवा, इंडिया याठिकाणी शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारत, नेपाळ, नायजेरिया, श्रीलंका या देशांमधून सुमारे १७५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्या स्पर्धेत भारताच्या टिममध्ये कु.अार्यन रमेश लोंढे याची निवड झाली होती. त्या स्पर्धेमध्ये त्याने कुमिते फाईट प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केल्याने त्याची नेपाळमध्ये  होणार्‍या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. त्यास  सिहान रमेश पिसाळ व प्रशिक्षक  सुषमा रमेश पिसाळ यांचे मार्गदर्शन  लाभले आहे.
       फोटो
गोवा येथील कराटे स्पर्धेत आर्यन लोंढे यांने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर तिरंगासह

No comments:

Post a Comment