आज शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर माढा तालुक्यातील रिधोरे येथे दगडफेक केल्याची घटना घडली.
या दगडफेकीत गाडी च्या काचा फुटल्या आहेत . सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक झाल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी सत्ताधारी व सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कुर्डूवाडीजवळील टोलनाक्यावरही सदाभाऊ खोत यांच्या कारवर मका, तुरी, गाजर फेकण्यात आले. पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली आहे. यावेळी शेतकर्यांच्या समस्यांना कंटाळून , राज्यातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याच्या अशा विविध कारणांमुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुर्डूवाडीजवळील रिधोर गावाजवळ राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली . मंत्र्यांच्या गाडीसोबत संरक्षक ताफा असताना देखील ही घटना घडली आहे.
▼
No comments:
Post a Comment