Tuesday, 27 March 2018

शाहू प्राथमिक विद्यालय शाळा क्र 14 ला साडे नऊ लाख रुपयांचा निधी जाहीर


कोल्हापूर प्रतिनिधी -  ज्योती दिपक पाटील. 

कोल्हापूर तोरस्कर चौक येथील शाहू प्राथमिक विद्यालय शाळा क्र 14 या संस्थेचे अध्यक्ष विक्रम घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या शाळेस साडे नऊ लाख रुपयांचा निधी जाहीर झाला आहे अशी घोषणा करण्यात आली. 

या शाळेस शिवसंस्कार फौंडेशनने 2014 साली दत्तक घेतले होते . त्या वेळी पटसंख्या अवघी 28 होती तर आता पटसंख्या 125 वर झाली आहे. या शाळेत ई लर्निंग, शालेय गणवेश वाटप, शालेय साहित्य व खाऊ वाटप आणि पिण्याचे शुद्ध पाणी पुरविले जाते असे विविध उपक्रम राबविले जातात. 

याशाळेच्या विविध उपक्रमांची दखल घेऊन कोल्हापूर मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी व नगरसेविका सरीता मोरे यांनी शाळेस साडे नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी घोषणा केली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी जयंत पाटील सर, किरण शिराळे, विश्वास सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लवटे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका कांबळे मॅडम यांनी केले. 


No comments:

Post a Comment