कोल्हापूर प्रतिनिधी.
पेठवडगाव येथील डॉ सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलने राष्ट्रभाषा विकास परिषद पुणे यांच्यामार्फत सप्टेंबर 2017 हिंदी राष्ट्रभाषा सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या हिंदी निबंध लेखन व हस्ताक्षर स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन केले असून या स्पर्धेत जास्तीत
जास्त विद्यार्थी सहभाग केलेबद्दल प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर तर परीक्षा आयोजक हिंदी
शिक्षक श्री. यशवंत बोराटे यांना सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे .
हिंदी राष्ट्रभाषा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रभाषा विकास परिषद पुणे
यांच्यावतीने आयोजित या परीक्षेत स्कूलच्या 186 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
त्यामधील 75 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत ही परीक्षा उत्तीर्ण झाले असून चार विद्यार्थ्याना
सुवर्णपदकासह प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे . यामध्ये अनुक्रमे
कु. अनुष्का सतिश जाधव ( इयत्ता 2 री),
कु. नम्रता शंकर खोत ( इयत्ता 6वी )
कु. वेदश्री प्रमोद पवार ( इयत्ता9 वी)
व अवंतिका राजसिंह यादव ( इयत्ता 10 वी)
या विद्यार्थ्यीनीना त्यांच्या उत्कृष्ठ
लेखनाबद्दल आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या विद्यार्थ्याचे सुवर्णपदक व
प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
या स्पर्धासाठी श्री. शाहू शिक्षण प्ररसारक सेवा मंडळ पेठ वडगांवचे अध्यक्ष श्री
गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव यांची प्रेरणा मिळाली तर संस्थेच्या
सचिव व डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ यांचे
प्रोत्साहन तर संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांचे मार्गदर्षन
लाभले. ही परीक्षा पार पाडण्यासाठी हिंदी विषय प्रमुख अमोल निर्वाणे, सविता निकम,
वैभव पाटील सागर सणगर व शुभांगी हंकारे यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment