हेरले/ प्रतिनिधी दि. २७/३/१८
महामोर्चाची दखल घेऊन राज्य सरकारने सुधारणा केली नाही तर राज्य स्तरावर कृती कार्यक्रम आखुन शिक्षण क्षेत्रातील समस्या हाणुन पाडूया असे आवाहन जेष्ठ शिक्षण तज्ञ डी.बी.पाटील
यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या सभेत ते बोलत होते.प्रमुख उपस्थितात शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस.डी.लाड, बी.जी.काटे(गडहिंग्लज) होते.
महामोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व मोठ्या संखेने उपस्थित राहून यशस्वी केल्याबद्दल सर्व घटकांचे त्यांनी अभिनंदन केले व भविष्य काळात सर्वानी एकीने राहून शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अरिष्ठांना परतवुन लावन्याचे आवाहन त्यांनी केले.
या सभेत जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्येवर चर्चा झाली.तालुकावार मुख्याध्यापक समिती तयार करण्यात आल्या.या सभेत महामोर्चा यशस्वी केलेबद्द्ल व शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त डी.बी.पाटील,एस.डी.लाड,व्ही.जी.पोवार व स्टार मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त बी.बी.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.या सभेला एस.व्ही.गुरबे(चंदगड),राजेंद्र खुराटे(गडहिंग्लज),जयसिंग पोवार(राधानगरी), एस.एस.वास्कर(शाहुवाडी), डी.ए.जाधव(पन्हाळा), ए.एस.रामाणे(कोल्हापुर),बी.एस.कांबळे(शिरोली), एस.टी.चौगुले(कागल), सी.एम्.गायकवाड व मुख्याध्यापक उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी केले.आभार कोल्हापुर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉ.ए.एम्.पाटील यांनी मानले.
फोटो
जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांचा महामोर्चा यशस्वी केलेबद्दल व शिक्षणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना बी.जी.काटे,एस.डी.लाड,व्ही.जी.पोवार, डॉ.ए.एम्.पाटील व अन्य
No comments:
Post a Comment