**
कोल्हापूर / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
इयत्ता १०वीच्या पुर्नरचित अभ्यासक्रमाची पुस्तके एप्रिलमध्येच उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचेकडे केली आहे.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १०वी बरोबरच इयत्ता ८ वीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदललेला आहे. शालेय जीवनात १०वीच्या परीक्षेचे आजही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पुढील वर्षीपासून १० वीच्या मूल्यमापन पद्धतीतही बदल होणार आहेत. बहुतांश शाळा उन्हाळी सुट्टीमध्येच १०वीच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करतात. त्यामुळे या वर्गाची पुस्तके लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे. गतवर्षी ९ वीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलला होता, परंतु शिक्षक प्रशिक्षणे वेळेत न झाल्याने त्याचा दुष्पपरिणाम अध्ययन अध्यापनावर झाला होता. त्यामुळे यावर्षी पुर्नरचित अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत उपलब्ध करावीत. तसेच शिक्षक प्रशिक्षणेही वेळेत व्हावीत अशी मागणी केलेली आहे.
▼
No comments:
Post a Comment