२३मार्च रोजी तमाम शिक्षकांच्यावतीने डॉ. एन .डी.पाटील व डी.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे महामोर्चा निघाला. सज्जनांनी मौन सौडलं नाही तर दुर्जनांचं नेहमीचं फावतं. अलिकडं सज्जन माणसं केवळ स्मशानातचं भेटतं असताना प्रचंड संख्येनं सज्जन माणसं मौन सोडून रस्त्यावर उतरली ही हुरूप वाढवणारी घटना आहे.
आज अखेर माणसं स्वत:च्या आर्थिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरत असतं. पण 'देश उभारणीसाठी शिक्षण' या ध्येयाने पेटून बुद्धिवादी रस्त्यावर आले ही मशाल अशीच पेटती ठेवावी असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी संपतराव गायकवाड यांनी केले.
"सर जी शिक्षक पालक समाज सम्पर्क" ग्रुपच्या कार्यक्रमात ते शिक्षणाच्या सद्य स्थितीबाबत बोलत होते.
'शिक्षण वाचावा' महामोर्चाबाबत आपली मते व्यक्त करताना संपतराव गायकवाड म्हणाले पगार वाढीसाठी,वेतन वाढीसाठी ,वेतन आयोग लागू होण्यासाठी रस्त्यावर न उतरता सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षक रस्त्यावर उतरला. गोरगरीबांच्या आयुष्यातील ज्ञानाचा प्रकाश गावातचं मिळावा,गरीबांच्या शाळा बंद पडू नयेत,खाजगी कंपनीकडे शाळा देऊन ज्ञानाचे खाजगीकरण होऊ नये म्हणून सर्वजन रस्त्यावर उतरले. शिक्षणात जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी पूर्वी बृहतआराखड्यानुसार गरज तेेथे शाळा हे धोरण राबविलं होतं.धनाड्यांच्या बगलबच्चांना शाळा काढताना बृहत आराखडा अडचणीचा ठरतो म्हणून 'स्वयंअर्थसहाय्य व खाजगी कंपनीस शाळा' हे धोरण राबविलं जात आहे. यास सर्व थरातून विरोध आवश्यक आहे या मोर्चातून व्यक्त झालेला रोष कायम ठवणे गरजेचे आहे.
बुद्धीवादी माणसं कधी एकत्र येत नाहीत असे म्हटले जाते . बुद्धीचा अहंकार त्यांना एकत्र येऊ देत नाही.पण या आंदोलनात सर्व बुद्धीवादी एकत्र जिवाच्या आकांताने भूमिका घेऊन उतरले. फोडा आणि झोडा निती हे धोरणही येथे लागू पडले नाही. कारण एखाद्या ज्वलंतं प्रश्नावर जेंव्हा चळवळ उभी राहते तेंव्हा सर्व वैयक्तिक स्वार्थ गळून पडतात व सर्वजण एकत्र येतात. काही ठिकाणी शाळा सुरूही झाल्या पण मुळासकट वृत्ती नाहीशी होणं गरजेचं म्हणून मोर्चा होता. अतिशय शिस्तीत
कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही अशी भूमिका घेतली. उर्दू परीक्षा व्यवस्थित पार पडावी म्हणून मोर्चेकऱ्यांनी स्वत:च्या मुलांसारखी उर्दू पेपरला जाणा-या मुलांची काळजी घेतली. आजारीअपंग(दिव्यांग),वयोवृद्ध ,अवघडलेल्या महिलांची काळजी मातेसारखी घेतली जाईल याचीही दक्षता घेण्यात आली. सत्ताधारी संवेदनशील मनाचे असतील तर सन्मानाने मागण्यांचा विचार करतील.वात पेटली की तोफा आपोआप धडधडू लागतात हे लक्षात घ्या . कोल्हापूरमध्यें ही वात पेटविण्याचे काम या ऐतिहासीक महामोर्चाने केले आहे. केवळ आणीबाणीतचं नव्हे तर सामाजिक प्रश्नावर स्वार्थाशिवाय आपण एक होऊ शकतो हे दाखवून दिले. सरकार हे जनतेचंच असतं .सरकार कडे जनतेने मागायचं नाही तर कोणाकडे? असा सवालही त्यांनी केला. यावेळी सुकुमार पाटील, समीर कटके, बाबुराव नारायण चव्हाण, बी वाय कांबळे,विवेक गवळी, बी एम कुंभार, ओमाजी कांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment