पेठवडगांव / प्रतिनिधी मिलींद बारवडे दि. २/४/१८
कोल्हापूर जिल्ह्यातील थकीत वेतन दिले व या आर्थिक वर्षातील सर्व देयकांसाठी ४५ कोटींहून अधिक तरतूद झालेची माहिती महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.व्ही.जी.पोवार दिली.*
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील व उच्च माध्यमिक शाळातील कर्मचारी यांचे १० कोटी थकीत बिले होती तसेच पुरवणी बिले ८ कोटी होती यासाठी जिल्हा व राज्य स्तरावर मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने पाठ पुरावा केला होता.या मंजूर तरतुदीत गतवर्षीच्या थकीत पगार बिला पोटी १० कोटी,पुरवनी बिलासाठी ८ कोटी,चालू वर्षाच्या वेतनासाठी ३१ कोटी,ज्युनिअर कॉलेजच्या चालू वेतनासाठी ४ कोटी,ज्यूनिअर कॉलेजच्या गत वर्षीच्या थकीत वेतनासाठी २ कोटी याशिवाय सैनिक शाळा,डी.एड कॉलेज,सराव पाठशाळा यांचाही यामध्ये समावेश आहे.याकामी शिक्षणाधिकारी किरण लोहार,वेतन अधिक्षक शंकरराव मोरे यांचे सहकार्य लाभल्याचे श्री.पोवार यांनी सांगितले.यामुळे शैक्षणिक क्षेत्रांतील कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Good
ReplyDelete