Thursday, 12 April 2018

विद्यार्थांनी लहानपणापासून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करावे - माधुरी लाड (नगरसेविका)


*

कसबा बावडा: प्रतिनिधी 

प्राथमिक  शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील  उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ च्या विविध स्पर्धेत  यश मिळवलेबद्दल  गुणवंत विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीचे आयोजन कसबा बावडा परिसरात पालकांच्या वतीने करण्यात आले. सदर गुणगौरव व कौतुक रॅलीचे उदघाटन नगरसेविका माधुरी लाड यांच्या हस्ते व शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी साहेब,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,रजनी सुतार ,शुभांगी चौगुले,वैशाली करपे,रमेश सुतार,भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन चौगले, स्वप्नील चौगले,राहुल भोसले,कृष्णा चौगले,राजेंद्र चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 


सदर प्रसंगी  KTS परीक्षा ,MSTS परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा,भारती विद्यापीठ, पुणे, इंग्रजी,गणित परीक्षा,हिंदी राष्ट्र सभा पुणे, व इतर स्पर्धेतील जिल्हा,शहर, गुणवत्तयादीत विजेत्या व गुणवंत विद्यार्थ्यांना ओपन जीप मध्ये उभे करून संपूर्ण कसबा बावडा परिसरात कोल्हापुरी फेटे बांधून  मिरवणुकीद्वारे फिरवण्यात आले.नगरसेविका माधुरी लाड यांनी शाळेतील गुणवतेबद्दल शिक्षक व पालक यांना आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिल्याबद्दल कौतुक करून शाळेने आपला गुणवत्तेचा आलेख असाच उंचावत ठेवावा असे आवाहन करून गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाब देऊन कौतुक केले. शाळांनी फक्त विद्यार्थी न घडवता या देशाचा सक्षम असा नागरिक घडवावा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.


 भारतवीर मित्र मंडळाचे चेतन चौगले,राजू चौगले,राहूल भोसले,कृष्णात चौगले व इतर कार्यकर्त्यानी ही विद्यार्थ्यांना पेढे वाटप करून अभिनंदन केले.

सदर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जान्हवी ताटे, वेदांतीका पाटील,जान्हवी कोरवी,सानिया देवकुळे,तनिष्का पाटील,ऋतुराज कोरवी,मयुरी कांबळे,निषिका शिंदे,श्रुतीका चौगले,दिशा कांबळे,प्रणव घेवदे,आदी मुलांचा समावेश होता. 


त्यापूर्वी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांचे हस्ते फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला .सदर कार्यक्रमाचे व रॅलीचे प्रास्ताविक मुख्याद्यापक अजितकुमार पाटील, नियोजन उत्तम कुंभार व सुशील जाधव यांनी केले.सुजाता आवटी,जयश्री सपाटे,प्राजक्ता कुलकर्णी,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,प्रभावळे मॅडम यांनी रॅलीच्या आयोजनात परिश्रम घेतले.कार्यक्रमचे आभार जे,बी,सपाटे मॅडम यांनी मानले

No comments:

Post a Comment