Tuesday, 3 April 2018

विवेकानंद महाविद्यालयामध्ये १२ वी वासंतिक वर्गाचे उदघाटन

कोल्हापूर प्रतिनिधी - प्रा.अनिल धस

विवेकानंद महाविद्यालयामध्ये इयत्ता १२ वी ( आर्टस्/कॉमर्स)वर्गाच्या वासंतिक वर्गास नुकतीच सुरुवात झाली. इयत्ता 11वी  उत्तीर्ण होऊन इयत्ता १२ वी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो.

    

    आज या वर्गांचे उदघाटन महाविद्यालयाच्या 'स्मृतिभवन' या सभागृहामध्ये प्राचार्य. डॉ. एस. वाय. होनगेकर यांचे शुभहस्ते झाले.

     'विद्यार्थ्यांनी गतवर्षातील चुका सुधारून नव्या उमेदीने अभ्यासास सुरुवात करावी, विद्याशाखा कोणतीही असो प्रत्येक शाखेमध्ये उज्ज्वल करिअर च्या अमाप संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करून अनावश्यक गोष्टी टाळाव्या. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी दिलेल्या त्रिसूत्री चा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यास आकार द्यावा असे प्रतिपादन  त्यांनी यावेळी केले.


     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.श्री.पोवार ए. आर हे होते. स्वागत विभाग प्रमुख प्रा.श्री.बी.एस. लाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. पालकर बी. पी यांनी केले. 

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. गवळी एम. पी यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment