Monday, 2 April 2018

शेतकऱ्यांना हजार रुपये देण्याची दानत फडणवीस सरकारची नाही - अजित पवार

 

मुरगुड प्रतिनिधी ( समीर कटके)

    निरव मोदी, ललित मोदी, चोक्सी, विजय माल्या यांनी जनतेचा पैसा लुटला. 29 हजार कोटी, साडेनऊ हजार कोटी रुपयांची लूट करून यांनी बँका लुटल्या. गोरगरिबांना लुटून मोठ्यांची भर करणाऱ्या या फडणवीस सरकारकडे सामान्य नागरिक , शेतकऱ्यांना देण्यासाठी  15 लाख तर सोडाच 1000 रुपये   दानत  नाही असा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी केला.

    मुरगुड ता कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तारूढ भाजप शासनाच्या विरोधात आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या  हल्लाबोल सभेत बोलत होते. 

      केंद्र आणि राज्य सरकार मध्ये शरद पवारांसारखे शेतकऱ्यांचे नेतृत्व होते तेंव्हा ऊस, कांदा, बटाटा, सोयाबीन, कापूस शेतकरी सरळ साहेबांशी सम्पर्क साधून आपल्या व्यथा मांडायचा आता शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नाही. त्यांच्यावर अस्मानी संकट ओढवले त्यांनी गळफास घेतले तरी यांच्यावर काही परिणाम नाही. कर्ज माफी पाहिजे तर थकबाकी भरा सांगतात दुष्काळ गारपीटीने मोडलेल्या शेतकऱ्याकडे थकबाकी भरायला पैसे असते तर तुझ्याकडे हात कशाला पसरले असते असा उद्विग्न सवाल त्यांनी केला .अशा निगरगट्ट शासनास विधानसभा लोकसभा निवडणुकीत उलथवून  टाका . महाराष्ट्रास 15 वर्षे मागे लोटणाऱ्या भाजप सरकारला आणि शेतकरी आणि लोकविरोधी काम करणाऱ्यांना खड्यासारखे फेकून द्या असे आवाहन त्यांनी केले.

        

      लहानग्यांच्या चिक्की, महामानवांचे फोटो, गोरगरिबांच्या औषधे, आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, चहा घोटाळा, उंदीर मारण्याचे औषध, कशातही भ्रष्टाचार करून पैसे खाणाऱ्या या सरकारला लाज,लज्जा, शरम आहे का ? असा प्रश्न त्यांनी केला.  महाराष्ट्रात लोकशाही आहे आपल्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या अंगणवाडी सेविकावर मेस्मा कायदा लावण्याचा प्रयत्न करणारे शासन जनतेची दडपशाही करून जनतेची मुस्कटदाबी करत आहे.कष्टकरी, आदिवासी, शिक्षक, माथाडी कामगार, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, व्यावसायिक सर्व अस्वस्थ असमाधानी आहेत.सहा कोटी रोजगार देण्याची थाप मारून सत्तेवर आलेल्या सरकारला राज्यातील तरुणांचे नोकरी आणि लग्नाचे वय उलटून चालले आहे हे दिसत नाही का ? अश्विनी बिद्रे या पोलीस अधिकारी असणाऱ्या महिलेची हत्या करून तुकडे करण्यात आले, पंढरपूरच्या नगरसेवकाचा भर दिवसा खून करण्यात आला अनिकेत कोथळे याला पोलिसांनी ठार मारून त्याला आंबोलीत जाळले महाराष्ट्रात कायदा संपून दहशतीचे राज्य आले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांची भाषणे झाली. 

      

स्वागत प्रविणसिंह पाटील यांनी केले. प्रास्ताविक आम हसन मुश्रीफ यांनी केले. आभार शिवानंद माळी यांनी मानले सभेस आम जयदेव गायकवाड, आम शशिकांत शिंदे, आम प्रकाश गजभिये, निवेदिता माने, चित्रा वाघ, के पी पाटील,  भैय्या माने, युवराज पाटील,गणपतराव फराकटे, ए वाय पाटील,  सतीश पाटील, संग्राम कोते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, नाविद मुश्रीफ उपस्थित होते. आभार शिवानंद माळी यांनी मानले.

No comments:

Post a Comment