शिरोली/ प्रतिनिधी दि. ३०/५/१८
अवधूत मुसळे
भूसंपादन जमिनीच्या मोजणीस विरोध करीत सोलापूर रत्नागिरी महामार्गास जमिनी देणार नाही. प्रशासनाने बळाचा वापर केल्यास प्रसंगी अटक करून घेणार असा निर्धार सोलापूर रत्नागिरी महामार्गाच्या शेतजमिनी बचाव कृती समिती शेतकऱ्यांनी स्थापन करून निश्चय केला आहे. निरंजन महाराज आश्रमामध्ये सभा घेऊन समितीची घोषणा करण्यात आली.
सोलापूर -रत्नागिरी महामार्ग चोकाक, माले, हेरले, मौजे वडगांव, नागांव, टोप आदी गावातून जाणार आहे. त्यामुळे या महामार्गास जमिनीची मोजणी करून भूसंपादन केले जाणार आहे. मात्र आदी गावच्या शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध केला आहे. जिरायती जमिनी खासगी पाणी पुरवठाद्वारे बागायती केल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपया कर्जे असून जमिनीवरही बोजा चढलेला आहे. तसेच या शेतकऱ्यांना चरितार्थासाठी या भागातील तोकडीच जमिन आहे. या प्रकल्पात जमिनी गेल्या तर काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे.
टोप, नागांव, मौजे वडगांव, हेरले , माले, चोकाक आदी गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन माजी सभापती राजेश पाटील व माजी. जि.प. सदस्य सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर -रत्नागिरी महामार्गाच्या जमिनीस विरोध कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या वतीने जमिनी देण्यास विरोध असून या गावातील होणाऱ्या जमिनींच्या मोजणीस विरोध, भूसंपादन विरोधी कायदेशीर सल्लागार नेमून कायदेशीर मार्ग अवंलबीत उच्च न्यायालयात न्याय मागणे, प्रसंगी बळाचा वापर केल्यास स्वतः अटक होणे आदी निर्णय सर्वानुमते घेण्यात आले. यानुसार मौजे वडगांव , चोकाक गावची मोजणी बंद पाडण्यात यश मिळविले.
या सभेस माजी सभापती राजेश पाटील, माजी जि.प. सदस्य सुभाष पाटील, मुनिर जमादार, अशोक मुंडे, अॅड. विजय चौगुले, बाजीराव थोरवत, स्वप्नील चौगुले, जलद पाटील, महावीर पाटील, पोपट चौगुले, बी.टी. सावंत, अभयसिंह पाटील, राजेंद्र पाटील, रंगराव गायकवाड,महावीर आलमाने, आदी प्रमुखासह शेतकरी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
फोटो
कृती समितीच्या वतीने मौजे वडगांवचे सरपंच काशिनाथ कांबळे निवेदन मोजणी अधिकार काटकर यांना देतांना.
No comments:
Post a Comment