फोटो- सिद्धनेर्ली येथील कार्यक्रम दरम्यान हसन मुश्रीफ व संजय घाटगे यांचा एकत्र सत्कार करताना ग्रामस्थ
सिद्धनेर्ली (वार्ताहर) - रविंद्र पाटील
येथे लोकवर्गणी मधून ग्रामस्थांनी बांधलेल्या विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा अध्यात्मिक व भक्ती मय वातावरणात संपन्न झाला यावेळी .शुक्रवारी ता ४ या मंदिराचा वास्तू शांती सोहळा झाला.शनिवारी ता ५ आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डाँ श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता मुर्ती प्राण प्रतिष्ठापना करणयात आली .त्याआधी सकाळी मुर्तींची पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली .सायंकाळी सात वाजता रामचंद्र भिवासे यांचे कीर्तन ठेवन्यात आले होते तर रविवारी ता ६ आडीच्या दत्त देवस्थानचे प पू राजीवजी महाराज यांच्या हस्ते दूपारी बारा वाजता कलाशारोहन सोहळा झाला.त्यानंतर महाप्रसाद वाटप ही करणयात आले .दूपारी बारा ते तीन या वेळेत ठिकपुर्ली येथील स्वर माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम तर सांयकाळी सात वाजता कृष्णानंद शास्त्री यांचे कीर्तनाचे आयोजन ही करण्यात आले होते चाळीस लाखांहून अधिक रक्कम खर्चून हे मंदिर उभारले आहे .
या कार्यक्रमाला कागल तालुक्यातील अनेक दिगग्ज नेत्यांनी हजेरी लावली.
*सिद्धनेर्ली येथील लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम दरम्यान कागल तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकत्र आल्यानंतर त्यांच्या एकत्र सत्कार सोहळ्याचा एक फोटो व्हायरल झाल्याने कागल तालुक्यात अनेक उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.
No comments:
Post a Comment