कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
कोल्हापूर कसबा बावडा ते शिये मार्गावरील पंचगंगा नदी पुलादरम्यान येथील पंचगंगा नदीपात्रामध्ये वाहत आलेले केंदाळ साठून मोठय़ा प्रमाणात पुलाच्या खांबालगत साचले आहे . दिवसेंदिवस या केंदाळाची वाढ होत जावून त्याचा वेढा पाणीउपसा करणाऱया इंटकवेलला पडल्याने पाणीउपस्यावरही त्याचा परिणाम होत आहे . तसेच पाणीही दुर्गंधीयुक्त व काळे झाले आहे .
बारमाही पाणी असणारी पंचगंगा आता प्रदूषणामुळे तसेच पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे केंदाळाने आच्छादली गेली आहे. या केंदाळाखाली श्वास गुदमरलेली पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीची आर्त हाक देत आहे, पण तिची हाक ऐकण्यास वेळ कोणाला आहे ? दरवर्षी वाढत्या प्रदूषणामुळे नदीचे केंदाळ वाढतच आहेत. शिरोली एम आय डी सी पुल येथील पंचगंगा नदीच्या पात्राची ही अवस्था म्हणजे प्रदुषणाचे भयाण रुप दाखवत आहे.
खूप ज्वलंत प्रश्न आहे हा.
ReplyDeleteखूप महत्वपूर्ण बातमी सर