प्रतिनिधी दि. १८ /६/१८
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने १८जून ते २७ जून वार्षिक प्रशिक्षणास सुरूवात झाली असून सिंधूदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आदी तीन जिल्ह्यातील ४५० छात्र सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.
दहा दिवसाच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये मॅप रिडींग, योगाची प्रात्यिक्षिके, फायरिंग, ड्रील, ऑप्टीकल, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सामाजिक जागृती, विविध खेळांची, जुडो,कराटे, लाठी काठी आदींचे प्रात्यक्षिके, सिव्हील, एनसीसी , राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्व पैलू लेक्चर्स, करिअर गाईडन्स आदी घटकांचे मार्गदर्शन होऊन प्रशिक्षण दिले जाणार आहे. १९ हायस्कूल, १६ कॉलेजचे एकूण ४५० छात्र सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.
कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के. तिम्मापूर यांच्या नेतृत्वाखाली शिबीरातील कार्यवाही होत आहे. अॅडम ऑफिसर मेजर विश्वनाथ कांबळी, एनसीसी अधिकारी , अॅन्थोंनी डिसोजा, राजेंद्र बनसोडे, वर्षा मस्के, तुकाराम पोवार, सुभेदार मेजर माणिक थोरात, ट्रेनिंग जेसिओ शिवाजी सुपणेकर, सुभेदार अशोक भांबुरडे, बीएचएम बाजीराव माने, सुभेदार हरी गावडे, राजाराम पाटील, सुभाष आढाव आदी अधिकारी वर्ग प्रशिक्षण देणार आहेत. अशी माहिती प्रसिध्दीस कर्नल आर.के. तिम्मापूर यांनी दिली आहे.
फोटो
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबीरामध्ये मार्गदर्शन करतांना कर्नल आर.के. तिम्मापूर समोर छात्र सैनिक
No comments:
Post a Comment