हेरले / प्रतिनिधी दि. १६/६/१८
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील बालावधूत हायस्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस हा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला .
१५ जून रोजी शाळेचा पहिला दिवस नविन प्रविष्ट नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शालेय पाठ्यपुस्तकेही देण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजीव चौगुले माजी उपसरपंच सुरेश कांबरे . ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे, अविनाश पाटील , सुनिता मगदूम यांनी आपली मनोगतें व्यक्त करून नवागत विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या . या वेळी पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
विद्या मंदिर मौजे वडगांव शाळेत पहिल्याच दिवशी साधारण दोनशे नवागतांचे पुष्पगुच्छ, पुस्तके, फुगे, शोभेच्या टोप्या देऊन भव्य दिव्य असे स्वागत शाळेच्या वतीने नुतन मुख्याध्यापक टी. एस. कुंभार यांनी केले. यावेळी नवीन बदली होऊन हजर झालेल्या अध्यापक आर.पी. कुंभार शिक्षक डी.एन. कुंभार ( कोरोची ) एफ.डी. मुल्ला आर.बी. म्हैशाळे शिक्षीका व्ही.जी. कांबळे , एस.एस. चव्हाण यांचेही स्वागत करण्यात आले.
यावेळी पि.के. सामाजीक ग्रुपच्या वतीने दोनशे नवागतांना प्रत्येकी एक पेन देऊन पहिल्याच दिवशी स्वागत केले.प्रास्तविक व स्वागत योगेश पाखले केले. यावेळी उपसरपंच किरण चौगुले, शा. व्य. समिती अध्यक्ष सागर अकिवाटे, सतीश कांबरे, नदिम हजारी तसेच ग्रां.पं.सदस्य अवधूत मुसळे, अविनाश पाटील, माजी उपसरपंच सुरेश कांबरे, सामाजीक कार्यकर्ते कॉ. प्रकाश कांबरे तसेच शिक्षकवृंद रझिया नदाफ, अविष्कार कांबळे, प्रशांत पाटील, पालक, माता, ग्रामस्थ उपस्थीत होते. आभार अविष्कार यांनी मानले.
फोटो
मौजे वडगांव येथे नवागतांचे स्वागत करतांना विरोधी पक्षनेते अविनाश पाटील, अवधूत मुसळे, सुरेश कांबरे
No comments:
Post a Comment