पेठ वडगांव : येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दुबर्इला भेट देऊन शैक्षणिक सहलीचा मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थी वर्गाला आंतरराष्ट्रीय शिक्षणाबरोबर अन्य देशातील, संस्कॄती, दळणवळण, शिक्षण, त्यांचे राहणीमान, हवामान, भौगोलिक स्थिती या गोष्टींचा अभ्यास करता यावा या हेतुने आंतरराष्ट्रीय दर्जाची सहल आयोजित करण्यात आली होती. ही सहल 7 दिवसांची होती. या अंतर्गत विद्यार्थी वर्गाने व पालकांनीही या सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.
सहलीच्या पहील्या दिवशी पेठ वडगांव ते मुंबर्इ व मुंबर्इ ते दुबर्इ असे प्रस्थान करण्यात आले. दुबर्इमधील सर्वात मोठया माॉलला भेट देण्यात आली. त्यामधील खरेदीचा आनंद वियार्थ्यांनी घेतला. मॉलमधील आकर्षक वस्तुंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यानंतर दुबर्इतील अॅक्वेरेम होमला भेट देण्यात आली त्यामध्ये ३३,००० हून जास्त प्राणी असलेल्या हया अक्वेरेममध्ये शार्कसह अन्य माशांचाही समावेश होता. त्यानंतर अंडरवॉटर झू व जगातील सर्वात उंच इमारत बुर्जखलीफा पाहीली. या इमारतीच्या 124 व्या मजल्यावरून संपूर्ण शहरावर एक नजर टाकली असता संपूर्ण शहर विहंगम दिसत होते. या इमारतीच्या असण्याने दुबर्इची एक वेगळीच ओळख झाली आहे.
सहलीच्या दुसया दिवसाची सुरूवात ही दुबर्इ शहरातील मुख्य ठिकाणे, प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये व गार्डन याने झाली , यानंतर वाळवंट सफारी करण्यात आली. जगातील सर्वात उंच हॉटेल बुर्ज अल अरबला भेट देण्यात आली , तद्नंतर बीच सफारीचा आनंद घेतला. प्रसिद्ध झय्यद रोड जो सात मुख्य शहरांना / विभागांना जोडला जातो तेथेही भेट देण्यात आली. दुबर्इ संग्रहालयाला भेट देऊन सर्वात जुनी इमारत कशी असू शकते हे पाहता आले. वाळवंट सफारीचा वाळूमधील अनुभव विद्यार्थी व पालकांना अनुभवता आला. ऍटलांटीस हॉटेल जे कॄत्रिमरित्या बनवलेल्या इसलॅन्डचा एक महत्वाचा भाग पाहून दुबर्इ विकासाचा आलेख अनुभवता आला.
तिसया दिवसाची सुरूवात ही बॉलीवूड पार्क व मोशन गेटला भेट देऊन झाली. बॉलीवूड पार्कमध्ये अभिनय व्यवस्था, अभिनय स्टंटस, अभिनयाचे विविध प्रकार याची माहीती घेवून प्रत्यक्ष अनुभव ही घेतला. त्यानंतर दुबर्इ मोशन गेटला भेट देण्यात आली. यामध्ये ऍनिमेशन, कोलंबिया पिक्चर्स, लायनगेट या गोष्टीनी सर्वांना आकर्षित केले. एकंदरीत या स्थळांना भेटी देताना मनातील आनंद व्दिगुणीत होत होता. सहलीच्या चौथ्या दिवशी बुर्जखलिफाला भेट दिली. दुबर्इ मॉलला भेट देवून औद्योगिक स्थानांचीही माहीती घेतली तदनंतर ढोह कुइस या ठिकाणी जावून मनमुराद आनंद लुटला. पाचव्या दिवशी अबूधाबीला भेट देण्यात आली व तदनंतर तेथील परिसर पाहून डोळ्याचे खरोखर पारणे फिटले. दुबर्इतील या शैक्षणिक सहलीमुळे वियार्थ्यांच्या ज्ञानात आधिक भर पडली. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीने एक वेगळाच अनुभव मिळाला असे अभिप्राय विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केले.
या सहलीसाठी 26 विद्यार्थी व पालक गेले होते. या आंतरराष्ट्रीय सहलीच्या उपक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ संस्था उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव यांचे प्रोत्साहन तर स्कूलच्या अध्यक्षा व संस्था सचिव सौ. विद्या पोळ संचालक डॉ. सरदार जाधव व प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांची प्रेरणा मिळाली.
No comments:
Post a Comment