Tuesday, 31 July 2018

पन्हाळा -गजापूर -विशाळगड 'परिसराच्या पहिल्या  शोधमोहिमेची पावडाई खिंडीमध्ये सांगता



पन्हाळा: 

पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ ,पन्हाळा यांच्या वतीने ऐतिहासिक पन्हाळा- गजापूर - विशाळगड परिसराचा अभ्यास करण्यासाठी दि .28 व 29 रोजी शोधमोहिमेचे आयोजन केले होते .

         ऐतिहासिक पन्हाळा -गजापूर-विशाळगड मार्गाने हजारो शिवप्रेमी चालत जातात . कासारी नदीचे उगमस्थान पावनखिंड मानली जाते .प्रस्थापित पावनखिंडीबाबत अभ्यासकांच्या मध्ये मत - मतांतर आहेत . अशा प्रकारच्या पाच - सहा खिंडी गजापूर परिसरात आहेत . असे मत पन्हाळ्याचे इतिहास अभ्यासक मु.गो.गुळवणी यांनी मांडले होते .ऐतिहासिक साधनातून गजापूरच्या घाटी मध्ये युद्ध झाले असे दिसून येते . प्राथमिक साधनांच्या आधारे या संपूर्ण परिसराचा अभ्यास करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते .

               या शोधमोहिमेमध्ये कुंवारखिंड , पावडाईखिंडीचा अभ्यास करण्यात आला . पन्हाळा ते पावडाई खिंडी दरम्यान असणाऱ्या गावांचा तसेच पाटेवाडी आदी ठिकाणच्या समाध्यांच्या नोंदी करण्यात आल्या .तीन दरवाजातून सुरुवात होऊन बांदीवडे मार्गे पावडाईखिंड मध्ये या शोधमोहिमेची सांगता झाली . पावडाई ते विशाळगड परिसराचा अभ्यास करण्यासाठी लवकरच दुसऱ्या शोधमोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी सांगितले .या शोधमोहिमेला मार्गदर्शन विनय चोपदार (इतिहास अभ्यासक , कोल्हापूर)यांनी केले .

        

     या शोधमोहिमेमध्ये पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे , संपर्कप्रमुख सुदर्शन पांढरे , एव्हरेस्टवीर अंकुश तेलंगे , मृणाल शेटे आदी अभ्यासक सहभागी झाले होते.

2 comments: