Friday, 20 July 2018

कोल्हापूर कि खड्डेपूर ?


कोल्हापूर प्रतिनिधी - रुपाली कागलकर 

दि. 20 जुलै 2018 

रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हे कोडे अद्याप कोल्हापूरकरांना समजू शकलेले नसून खड्डे हे कोल्हापूरकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत. खड्डय़ांमुळे लोकांची हाडे खिळखिळी होत असताना महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना याचे काहीच सोयरसुतक नाही.

 असाच प्रकार पहायला मिळतो. जवाहर नगर शाहु सैना चौक ते  के .एम .टी  वर्कशॉपकडे जाणारा रस्ता गेली दोन वर्षापासुन खड्यांनीच भरला आहे.या  रस्त्याची दूरुस्ती रखडल्याचा फटका  नागरिकांना बसत अाहे .खड्डे  चुकवताना वाहनचालकांचे अनेक छोटे  मोठे  अपघात  दैनंदिन घड़त  अाहे .

   

  य़ा रस्त्यावरून दररोज अॅस्टर आधार हॉस्पिटलच्या अॅम्बुलन्स ,के .एम .टी  अाणि स्कुल  बस  अशी हजारो वाहने ये जा करतात तरी प्रशासनाला काहीही फिकिर नाही. 

      दोन  वर्षापूर्वी  या  रस्त्याची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली  होती . पण या  दोन  वर्षात  पाऊस  आणि  वाहतुकीने या  रस्त्यावर जागोजागी  खड्डे  पडले  आहेत .पावसाळ्यात तर वाहनचालकांना या  रस्त्यावरून प्रवास नकोसा वाटतो.

 रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करुन खड्डे भरावे व लोकांना दिलासा मिळावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. 

1 comment: