प्रतिनिधी सतिश लोहार ...........
नागाव ( ता. हातकणंगले ) गणितासारख्या अवघड विषयात विविध युक्त्या वापरून विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने गणिताची आवड निर्माण करणारे अवलिया म्हणूनच *दिपक शेटे* यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. " गणित लॅब " स्वतः तयार करून अवघड अशा गणिताच्या संकल्पना सुलभ करून दाखवल्या आहेत.याचा लाभ सामान्य विद्यार्थ्यांच्या पासून कुशाग्र विध्यार्थ्यांना होत आहे.
गणितीय वस्तूंचा मोठा संग्रह त्यांनी आपल्या घरी केला आहे. यामध्ये गणिताशी निगडित विविध मोजमापे, दिडशे वर्षाचे पितळी कॅलेंडर, विविध नाणी, दिशादर्शके, द्रव - धातू यांची अती सुक्ष्म मोजमापे, सॅडो घड्याळ, घटिका, अभियांत्रिकी महाविद्यालय फार पुर्वी वापरली जाणारी विविध उपकरणे याचा मोठा साठा त्यांनी गोळा केला आहे. यासाठी अनेक ठिकाणी भ्रमंती करून त्यांनी आपला अमूल्य वेळ आणि पैसा खर्च केला आहे. व्यक्तीला विविध छंद असतात. पण गणिताचा छंद जोपासणारे दुर्मिळ आहेत.
नागाव ( ता. हातकणंगले ) या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. संख्याशास्त्र या विषयात मास्टर ऑफ सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बी. एड. करुन आदर्श विध्यानिकेतन पेठ वडगाव येथे गणित आणि विज्ञानचे शिक्षक म्हणून गेली आठरा वर्षे कार्यरत आहेत. हे करत असताना त्यांचे शिक्षणही सुरू आहे. डिप्लोमा इन काॅम्प्यूटर प्रोग्रॅमिंग आणि डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट करुन आता ते एम.ए. एज्युकेशन करत आहेत.
गणिताशिवाय एकही दिवस जगणे हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी अशक्य आहे. असे असताना विद्यार्थ्यांना सर्वात अवघड असणारा विषय म्हणजे गणित. असे का ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिपक शेटे यांनी केला. विशेष म्हणजे याचे उत्तरही त्यांना गणितातच मिळाले. विद्यार्थ्यांना विविध गणितीय उपक्रमातून गणिताची गोडी लावली. यासाठी त्यांनी ' किल्ली भुमितीची ' आणि ' जीवनातील गणित ' या स्वलीखित नाटकांवर विद्यार्थ्यांना सादरीकरण करायला लावले. अंकवेल, गणितीय नियम व सूत्रे आणि गणित कोष ही त्यांची गणिता विषयी आवड निर्माण करणारी पुस्तके विद्यार्थ्यां प्रमाणे पालकांनाही आकर्षित केल्याशिवाय रहात नाहीत. त्यामुळेच दिपक शेटे हे गणित जगतात आणि जगवतात असे म्हटले जाते. गणिताची कोल्हापूर परीसरातील सर्वात मोठी लॅब करण्याचा त्यांचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी ते विशेष परिश्रम घेत आहेत.*इ.१० वी गणित चे पाठयपुस्तक क्यू आर कोड द्वारे दोन पानात बसवले आहे* त्यामूळे गणित विषय तंत्रज्ञानाद्वारे समजण्यास सोपा झाला आहे . *श्री दिपक शेटे यांनी महाराष्ट्रात प्रथमच निर्माण केलेले डिजीटल स्मार्ट बुक बद्दल कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक श्री किरण लोहार यांनी कौतुक व त्यांचा सत्कार केला, सतत गणितातील नव नवीन कल्पना , लेखन याबद्दल शिक्षण मंत्री मा . विनोद तावडे यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांच्या कामाची दखल घेतली ..,,
No comments:
Post a Comment