कोल्हापूर प्रतिनिधी.
दिनांक 31 जुलै 2018 रोजी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी याचा 38 वा स्मृती दिन होता . यानिमित्ताने त्यांच्याच गाण्यांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. स्वरविलास मंच कसबा बावडा यांचे वतीने रफींच्या बहारदार गाण्याच्या सादरीकरणातुन वैशिष्टय़पूर्ण गानस्वरांजली अर्पण करण्यात आली . हा कार्यक्रम मा. मोहन सालपे (पापा) नगरसेवक को.म.न.पा. यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
गायक सर्वश्री विलास पोवार, राजू, सावंत, भिकू कांबळे , सौ. सारिका यांनी रफींची लोकप्रिय गाणी गायली. तर श्री आदित्य म्हैंदरगीकर यांनी बहारदार निवेदन केले.
श्री. अमर कोलेकर यांनी ध्वनी संयोजनाचे काम पाहिले. रसिक चाहत्यांंनी सर्वच गाण्यांना भरभरून दाद दिली.
श्री. दिपक अष्टेकर श्री. अशोक गुंडप, धरनेंद्र टिक्के साहेब , श्री. सर्जेराव सोनवणे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment